Wednesday, February 21, 2024

शेतकऱ्यांना प्रोत्साहानपर 50 हजार अनुदान मिळणार ? अजित पवारांनी केली घोषणा

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि गडहिंग्लज दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचा नागरी सत्कार तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी अजित पवार यांच्याकडून चंदगड नगरपंचायतीला 10 कोटीचा निधी जाहीर करण्यात आला. घड्याळ तेच पण वेळ नवी असे धोरण ठरवून आम्ही काम करत आहोत. कायदा सुव्यवस्थेचा बाबतीत विरोधक आरोप करत आहेत, अशा घटना घडत आहेत,

पण या सर्व प्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत. कोणी मोठ्या बाबाचा असला, तरी कायदा आणि संविधान सर्वश्रेष्ठ आहे. दादागिरी आणि गुंडगिरीला बळी पडू नका, असेही ते म्हणाले.

वंचित शेतकऱ्याना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे, अशी मागणी होती. 70 हजारांहून अधिक शेतकरी या योजनेपासून वंचित होते, त्यांना आम्ही मदत करण्याचे ठरविले आहे, लोकसभा निवडणुकीच्या छत

आचासंहितेपूर्वी प्रोत्साहन अनुदान 50 हजार रुपये शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात केली. पाण्याचे दर कमी करावेत अशी शेतकऱ्याची मागणी होती,

आम्ही ते दर कमी करून पूर्ववत केली आहेत, असेही ते म्हणाले.अजित पवार म्हणाले की, आम्ही वेगळी भूमिका घेऊन जात आहोत. मात्र, वरिष्ठांचा आम्ही कायम आदर ठेवू. आम्ही देखील साठीच्या पुढे गेलो

आम्हाला कधी संधी मिळणार? अशी विचारणा त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज काढत आहोत. कोल्हापुरात हजारो कोटींचे रुग्णालय होत असल्याने गोरगरिबांना याचा फायदा होईल. कोरोनासारखा आजार कधी उद्भवेल सांगता येत नाही,

त्यामुळे संध्याकाळ झाली की चंद्रावर जाण्याची गरज नाही. तांबडा पांढरा रस्सा घ्या पण निर्व्यसनी रहा, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला. त्यांनी पुढे सांगितले की, सीमाभागातील मराठी

 

शाळांना मदत केली पाहिजे. त्या शाळा कशा चांगल्या होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहो.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!