Monday, May 6, 2024

भविष्य निर्वाह निधीसाठी सर्वात मोठा निर्णय

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी ( Provident Fund ) च्या खात्यावर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) दरवर्षी

व्याजदर जाहीर करते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत सुमारे 7 कोटी कर्मचारी जोडले आहेत. ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) ने शनिवारी झालेल्या

बैठकीत 2023-24 साठी EPF वर मोठा व्याजदर देण्याचा निर्णय घेतला अशी माहिती सूत्रांनी दिली. EPFO ने व्याज दर निश्चित केल्यानंतर वित्त मंत्रालय त्यावर अंतिम निर्णय घेते. मार्च 2022 मध्ये 2021-22 साठी EPF वर 8.1 टक्के इतका व्याजदर कमी केला होता

जो चार दशकांतील सर्वात कमी होता. मात्र, ती कसर आता भरून काढण्यात आली आहे.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने 2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याज दर 8.25 टक्के निश्चित केला आहे.

हा व्याज दर गेल्या तीन वर्षांतील सर्वोच्च आहे. 2020 -21 मध्ये EPF वर 8.5 टक्के इतका व्याजदर होता. तर, 2021-22 मध्ये 8.1 टक्के इतका व्याज दर होता. मार्च 2023 मध्ये, EPFO ने 2022-23 साठी EPF वर व्याज दर 8.15 टक्के इतका किरकोळ वाढवला होता.

मात्र, यात आता दहा टक्क्यांची वाढ केली आहे.मार्च 2022 मध्ये EPFO ने 2021 – 22 साठी EPF वर 8.1 टक्के व्याजदर कमी केला होता. जो चार दशकांतील सर्वात कमी व्याज दर होता. ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड

ऑफ ट्रस्टीज (CBT) ने शनिवारी झालेल्या बैठकीत 2023-24 साठी EPF वर 8.25 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला अशी माहिती सूत्रांनी दिली. CBT च्या निर्णयानंतर 2023-24 साठी EPF ठेवींवरील व्याज दराबाबतचा निर्णय मंजुरीसाठी

वित्त मंत्रालयाकडे पाठवला जाईल. सरकारच्या मंजुरीनंतर 2023-24 साठी EPF वरील व्याज दर EPFO च्या सहा कोटींहून अधिक ग्राहकांच्या खात्यात जमा केले जातील.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!