माय महाराष्ट्र न्यूज:सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी केंद्र सरकारकडून मिळाली आहे. सध्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत आहे. दर दहा
वर्षांनी वेतन आयोग गठण केले जाते. यामुळे आता कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचे वेध लागले आहे. सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोग गठीत होण्याचा वाट पाहत होते. राज्यसभेत
आठव्या वेतन आयोगासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर केंद्र सरकारकडून उत्तर दिले आहे. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी यासंदर्भात सांगितले की, सध्या सरकारसमोर वेतन आयोग गठीत करण्याचा
कोणताही प्रस्ताव नाही. खासदार रामनाथ ठाकूर यांनी हा प्रश्न विचारला होता.अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, सरकार नवीन वेतन आयोगाचा भार उचलण्याच्या परिस्थितीत नाही. यामुळे आठवा वेतन आयोग स्थापन झाला नाही. जगातील पाचवी
सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचा दावा करणारे सरकार गेल्या 30 वर्षांपासून महागाईचा सामना करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आढावा घेण्यासाठी आठवा वेतन आयोग का स्थापन करत नाही? या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्र्यांनी
असा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर विचाराधीन नसल्याचे सांगितले.देशातील पहिली वेतन आयोग जानेवारी 1946 बनला होता. सातवा वेतन आयोग 28 फेब्रुवारी 2014 रोजी गठीत केला होता. त्याला आता दहा वर्ष झाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना
आठव्या वेतन आयोगाचे वेध लागले आहे. मात्र सरकारकडून राज्यसभेत देण्यात आलेल्या या माहितीमुळे कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे.8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर कर्मचारी आणि पेन्शनधारकांशी संबंधित संघटनांकडून DA वाढ अपेक्षित आहे.
सध्या देशभरात सुमारे 48.62 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 67.85 लाख पेन्शनधारक आहेत. कर्मचाऱ्यांसाठी दिलासदायक गोष्टी म्हणजे सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी
महागाई भत्ता जाहीर करू शकते. सध्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मुळ वेतनाचा 46% आहे.