Monday, May 6, 2024

आता Youtube वरून दरमहा होणार मोठी कमाई; जाणून घ्या कंपनीची ‘ही’ नवी पॉलिसी

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अनेकजण घरबसल्या पैसे कमावू लागले आहेत. युट्यूब देखील यापैकीच एक आहे. युट्यूबवरूनही लोक चांगली कमाई करतायत. जर तुम्हालाही ऑनलाईन पद्धतीने

पैसे कमवायचे असतील आणि युट्यूब चॅनेल सुरु करायचं असेल तर यासाठी तुम्हाला नवीन पॉलिसीची माहिती असणं गरजेचं आहे. याच्या मदतीने तुम्हाला पैसे कमावणं जास्त सोपं होईल.

पण, त्याचबरोबर हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की, YouTube च्या पॉलिसीत सतत बदल होत असतात. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.यूट्यूबवर चॅनल सुरु केल्यानंतर, तुम्हाला ते Monitize करावं लागतं. यानंतर तुम्ही

युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावू शकता. तसेच, कमाई करण्यासाठी तुम्हाला किमान 500 सबस्क्रायबर्स आणि 3 हजार तास वॉच टाईम गरजेचा आहे. तसेच, अनेक जुन्या यूजर्ससाठी ते अद्याप केवळ 1 हजार सबस्क्रायबर्स आणि 3 हजार तास आहे.

हे गेल्या 12 महिन्यांनुसार मोजले जातात. याशिवाय, तुम्हाला गेल्या 90 दिवसांत 3 पब्लिक अपलोड करावे लागतील. या वेळी, तुम्हाला YouTube च्या कम्युनिटी गाईडलाईन्स आणि काही अटी देखील लक्षात ठेवाव्या लागतील.

सर्वात आधी तुम्हाला तुमच्या चॅनलची कमाई करता येते की नाही हे पाहणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला यूट्यूब स्टुडिओमध्ये Sign In करावे लागेल. तुम्हाला नेव्हिगेट बारमधील कंटेंटवर क्लिक करावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला ज्या

व्हिडीओच्या माध्यमातून पैसे कमवायचे आहेत त्यावर क्लिक करावे लागेल. आता डाव्या मेनूवर जाऊन आणि Income वर क्लिक करा. शेवटी, Start वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सर्व सूचनांबद्दल संपूर्ण माहिती मिळवावी लागेल.

तुम्ही YouTube वर वेगवेगळ्या प्रकारे पैसे कमावू शकता. पण, जर तुम्हाला चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर त्यासाठी युट्यूबरवर चांगला कंटेंट पोस्ट करणं गरजेचं आहे. चांगल्या कंटेंटच्या मदतीने, व्हिडीओचा रिच देखील खूप जास्त वाढेल.

जितके जास्त लोक व्हिडीओ पाहतील, तितकी कमाई चांगली होईल. म्हणून, जेव्हा तुम्ही व्हिडीओ पोस्ट करता तेव्हा त्याची चांगली काळजी घ्या. तसेच, कंटेंट निवडताना तो कंटेट आपल्या चॅनेलनुसार करा.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!