शेवगाव/प्रतिनिधी
जयश्रीने ठाकूर निमगाव परिसर आणि तालुक्यात आदर्श उभा केला आहे. तिचा हा खडतर प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारा आहे असे गौरोवोद्गार माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यातील ठाकुर निमगाव येथील कु.जयश्री सुमन रमेश कातकडे हिची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग जूनियर इंजिनियर वर्ग-२ पदावर निवड झाल्याबद्दल तिचा माजी आ.चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला,त्यावेळी ते बोलत होते.
संजय कोळगे, गहिनीनाथ कातकडे, रघुनाथ घोरपडे,जयश्री कातकडे, नरेंद्र कातकडे,नारायण निजवे, मोहन कातकडे, आबासाहेब कातकडे, हभप राजु महाराज, प्रकाश महाराज, घावटे सर, नामदेव खेडकर, अशोक भगत मेजर, पंढरीनाथ कातकडे, मच्छिंद्र कातकडे, भागवत कातकडे, यासह विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थीत होते.
श्री. घुले पुढे म्हणाले की, जिद्द ,चिकाटी ,मेहनत आणि सातत्य यामुळे शेकडो संकटावर मात करून जयश्रीची ही निवड झाली. तिची ही निवड समस्त शेवगाव तालुक्यातील सर्वाना अभिमानास्पद आहे. सर्व गावकरी आणि पंचक्रोशीने व नातेवाईक यांनी तिचा सत्कार समारंभ आयोजित केल्याबद्दल सर्व गावकरी आणि नातेवाईकांचे मनःपूर्वक अभिनंदन. विद्यार्थ्यांचे योग्य ते कौतुक झाल्यास त्याला पुढील कार्यासाठी, वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळत असते. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असल्याने त्यांना प्रोत्साहित करणे हे आपले कर्तव्य आहे.




