Tuesday, July 1, 2025

नगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप ;या बड्या नेत्यांनी केला अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेली अनेक दशके राजकारणात वर्चस्व असलेले नागवडे परिवारातील राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे

यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला. पुण्यामधील बालेवाडी येथे आज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले नागवडे दांपत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचं स्वागत अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी गळ्यामध्ये

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या घड्याळाचा पंचा टाकत आणि पुष्पगुच्छ देत केले.गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेंद्र नागवडे आणि जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे दाम्पत्य काँग्रेस पक्षावर काहीसे नाराज होते.

गेल्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने आणि समर्थ कार्यकर्त्यातून विधानसभा निवडणूक लढवावी असा मोठा आग्रह झाल्यानंतर नागवडे दाम्पत्यांने कोणताही परिस्थितीमध्ये 2024 ची विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार केला होता.

दरम्यान गेल्याच महिन्यामध्ये दिवंगत शिवाजीबापू नागवडे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हजेरी ही सूचक मानली जात होती. त्यानंतर मधल्या काळामध्ये अनेकदा मुंबईमध्ये नागवडे दाम्पत्यांने अजित पवार यांची भेट घेतली होती.

त्यामुळे त्यांचा प्रवेश हा निश्चित झालेला होता. दरम्यान जयंती सोहळ्यातच त्यांनी काँग्रेस पक्षाचे राजीनामे देत लवकरच राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे घोषित केले होते.

त्याच आज पुण्यामध्ये बालेवाडी मध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक मेळाव्यामध्ये राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी पक्षप्रवेश केला आहे. सध्या या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार बबनराव पाचपुते विद्यमान आमदार

असताना त्याचबरोबर शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल जगताप पूर्ण तयारीत असताना आता नागवडे दाम्पत्याने राष्ट्रवादी पक्षातून आपल्या उमेदवारीची दावेदारी दाखल केलेली आहे.

त्यामुळेच श्रीगोंदाचे राजकारण आता मोठे लक्षवेधी होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!