Monday, May 20, 2024

नितीन उदमले यांनी घेतले पैस खांबाचे दर्शन

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे संभाव्य उमेदवार व भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन उदमले यांनी नेवासा येथे येऊन पैसे खांबाचे दर्शन घेतले आहे.

उदमले यांनी शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी नेवासा तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या.भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांची भेट घेतली .उदमले यांनी नेवासा येथे पैस खांबाचे दर्शन घेतले त्यावेळी भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे, माजी तालुकाध्यक्ष माऊली पेचे,

भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, अशोक टेकणे,अनुसूचित जमाती मोर्चा शहराध्यक्ष रोहित पवार, युवा मोर्चा सचिव श्रीकांत बर्वे, कामगार मोर्चा संयोजक विवेक ननावरे, शहर उपाध्यक्ष राजेश कडु,

सोशल मीडिया संयोजक आदिनाथ पटारे,राजेंद्र मुथ्था, विलास बोरुडे, रमेश घोरपडे, अजितसिंह नरुला, अशोक मारकळी, एड. संजीव शिंदे, डॉ भारत करडक, शंकर कणगरे आदी उपस्थित होते.

उदमले हे भाजपाचे संभाव्य उमेदवार म्हणून बघितले जात आहे.ते अनेक दिवसांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी भेटी गाठी घेत आहेत.तसेच नागरीकांच्या समस्या जाणून घेत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पातळीवर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहे असे बोले जात आहे . की शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा ही भारतीय जनता पक्षाने लढवावी व नितीन उदमले यांनी त्या ठिकाणाहून उमेदवार द्यावी.

तसे जर झाले तर भाजपला एक चांगला उमेदवार मिळू शकतो व ही जागा भाजप जिंकून येऊ शकतो अशी चर्चा मतदारसंघातील सामान्य मतदार मध्ये बोले जात आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!