Monday, May 20, 2024

ज्ञानेश्वर कारखान्याला बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटिव्ह शुगर मिल पुरस्कार प्रदान

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला भारतीय शुगर  या संस्थेकडून राज्य पातळीवरील बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटिव्ह शुगर मिल अँवार्ड हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शनिवार दि.१० फेब्रूवारी रोजी कोल्हापुर येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग व तज्ञ संचालक डॉ.क्षितिज घुले पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कारखान्याचे संचालक काकासाहेब नवरडे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, अड. हिम्मत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

भारतीय शुगर, कोल्हापुर ही मान्यता प्राप्त संशोधन संस्था असून १९७५ पासून सहकारी आणि खाजगी साखर क्षेत्रासाठी काम करते. या संस्थेतर्फे दरवर्षी साखर उद्योगात कार्यरत असणारे साखर कारखाने, अधिकारी व पदाधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.कारखान्याचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले पाटील व माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सर्वांगीण क्षेत्रात केलेले कार्य, साखर उद्‌द्योगातील अमूल्य योगदान आणि साखर उद्योगाला आघाडीवर आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हा “बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटिव्ह शुगर मिल अवॉर्ड” देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याने सहकार क्षेत्रात कारखान्याचे नाव उंचावले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!