Sunday, December 22, 2024

65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये…

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री वायोश्री योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा लाभ 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना काही

शारीरिक अपंगत्व किंवा मानसिक आजार आहे तसेच ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल अशा नागरिकांची तपासणी केली जाईल आणि पात्र आढळलेल्यांना 3,000 रुपये दिले जातील. ही योजना

सर्व जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये खर्चून राबविण्यात येणार आहे. सहकारी संस्थांवरील विश्वास वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने सहाय्य योजना जाहीर केली आहे. दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या राज्य

मंत्रीमंडळ बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविली जाणार आहे. अगोदर ठराविक जिल्हांमध्ये ही योजना सुरु होती.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात हि वयोश्री योजना राबविली जाणार आहे. 65 वर्षावरील नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये अशा नागरिकांना वयोश्री

योजनेचा लाभ घेता येणार आहे.आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे.ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण

सुद्धा या योजनेतून देण्यात येणार आहे.तुमच्या घरात कोणी जेष्ठ नागरिक असतील तर तुम्ही त्यांना या योजनेबद्दल सांगू शकता. पात्र नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकता. योजने बद्दलची अधिक माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!