Monday, October 14, 2024

एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत ? भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आमदार गिरीश

महाजन यांनी याबाबत भाष्य केले आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, एकनाथ खडसे

भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत आहेत, असे मला कळाले आहे. दिल्लीतून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत. पण अद्याप पक्षाच्या नेत्यांकडून मला याबाबत विचारणा झालेली नाही.

मला वाटतं तसं काही प्रयोजन नाही. मला अजूनतरी कोणीही एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये परत घ्यायचे किंवा नाही, याबद्दल विचारलेले नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. कदाचित एकनाथ खडसे यांची थेट वरुन हॉटलाईन

असेल तर त्यांनी लावावी, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची चर्चा सुरु आहे. एकनाथ खडसे यांची भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी बोलणी सुरु असल्याचे कळते. परंतु, अद्याप

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल दाखवला नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे खडसेंची घरवापसी रखडल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजिक कार्यक्रमांमध्ये किंवा

प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. ते पूर्वीइतक्या आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडताना दिसत नाहीत. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा अजित पवार गटाला दिल्यानंतर खडसे

गायब असल्याचे सांगितले जाते.गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची चर्चा सुरु आहे. एकनाथ खडसे यांची भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी बोलणी सुरु असल्याचे कळते. परंतु, अद्याप

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल दाखवला नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे खडसेंची घरवापसी रखडल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे गेल्या अनेक दिवसांपासून

सार्वजिक कार्यक्रमांमध्ये किंवा प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. ते पूर्वीइतक्या आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडताना दिसत नाहीत. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा अजित पवार गटाला दिल्यानंतर खडसे गायब असल्याचे सांगितले जाते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!