Friday, May 10, 2024

उद्धव ठाकरे मोठं विधान म्हणाले तर आजही शंकरराव गडाख मंत्री असतेच

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेना पक्षप्रमुख दोन दिवसांच्या शिर्डी दौऱ्यावर असून, मंगळवारी त्यांचे सोनई येथे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले.

सोनईवासीयांनी केलेल्या स्वागतामुळे ठाकरे हे भारावून गेले होते. सोनईतील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला.सोनईमधील सोन्यासारख्या मर्दमावळ्यांनो मी राज्यभर फिरतोय.

मी खरंच भारावून गेलो आहे. सत्ताधारी पक्षाच्या सभेला अशी गर्दी समजू शकतो मात्र ज्याच्याकडे पक्ष ठेवले नाही, चिन्ह ठेवले नाही, मी आता काही देऊ शकत नाही तरीही तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात मी

तुमच्यासमोर नतमस्तक आहे.मी एक गोष्ट देऊ शकतो तो म्हणजे विश्वास जो त्यांच्याकडे नाही. गद्दारांनी सरकार पाडलं नसतं तर आजही शंकरराव मंत्री असतेच. ते आज तिकडे गेले असते तरी ते मंत्री असते मात्र तुम्ही जे धाडस दाखवलंत त्याला म्हणतात निष्ठा.

मला काही मिळो अथवा न मिळो , मला ज्यांनी निवडून दिलं त्यांना मी दगा देणार नाही अशी भूमिका त्यांची असल्याने त्यांच्यावर जनता प्रेम करते.परवापर्यंत अशोक चव्हाण आपल्याशी नीट बोलत होते, जागावाटपाची चर्चा करत होते, असे

अचानक जातील असे वाटले नव्हते. आम्ही अशोक चव्हाणांवर आरोप केले नव्हते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चव्हाणांवर आरोप केले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे.

या घोटाळ्याची आठवण अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने पुन्हा झाली. भाजपही 400 पार बोलून बसलाय आणि घाबरलाय ..400 पार जाऊ दे ते 40 पारही नाही होणार. 400 पार आकड्यासाठी आता नितीश कुमारांना फोड, शहीद कुटुंबियांचा अपमान

केलाय, डिलर बोललोय तरी अशोक चव्हाणांना घ्या असे चालले आहे. भाजपही घाबरून गेली आहे आणि अशोक चव्हाणही घाबरल्याचे म्हणतायत. दोघेही एकमेकांवर काय आरोप केलेत हे विसरून गेलेत.

मला नाही अब्रू मी कशाला घाबरू अशी यांची परिस्थिती आहे. अब्रूच राहिलेली नाही, त्याचे धिंडवडे उडालेले आहेत असे ठाकरे म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!