Saturday, May 11, 2024

तिकडे गेले असते तर त्यांना मंत्रिपद दिले असते पण गडाखांनी निष्ठा ठेवली-उद्धव ठाकरे

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

सोनईतील सोन्यासारखे माझे मर्द मावळे, काय वर्णन करू मी राज्यभर फिरतोय, ज्यांच्याकडे पक्ष चिन्ह नाही तरीही तुम्ही प्रेम करतात. मी नतमस्तक होतो. माझ्याकडे तुम्हाला द्यायला विश्वास आहे. गडाख आणि शिवसेना अशी जवळीक नव्हती. २०१९ मध्ये अपक्ष निवडून आले आणि आपल्याकडे आलेत मंत्रिपद दिले. आज तिकडे गेले असते तरी त्यांना मंत्रिपद दिले असते पण गडाख यांनी निष्ठा ठेवली ते तिकडे गेले नाही अशा शब्दात शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आ.शंकरराव गडाख यांचे कौतुक केले.

नेवासा तालुक्यातील सोनई येथे आयोजित शिवसंवाद मेळाव्यात शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते.
खासदार संजय राऊत,विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार शंकरराव गडाख, माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, युवा नेते उदयन गडाख, शिवसेनेचे जिल्ह्यातील- तालुक्यातील पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की,अशोक चव्हाण  कालपर्यंत आमच्याशी जागा वाटपाबाबत बोलत होते. ते अचानक भाजपसोबत गेले, भाजप  ४०० पार बोलले आणि घाबरले आहेत. त्यांचे ४० देखील खासदार निवडून येणार नाहीत. अर्थसंकल्पानंतर श्वेत पत्रिका काढली. त्यात आदर्श घोटाळा आणि संजय चव्हाण यांचे नाव आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या क्लिप आहेत. आदर्शमधील डीलर असा उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. मला नाही अब्रू मी कशाला घाबरू, अशी भाजपची परिस्थिती आहे, जे घाबरतात ते भाकड पक्षात जातात, अशी कडाडून टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी केली आहे.
जे घाबरतात ते भाकड पक्षात जातात.

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याऐवजी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला पाहिले होते. मी पहिला मुख्य मुख्यमंत्री असेल ज्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. जनता आता पंचनामा करणार आहे. आता किती जणांना पीक विमाची रक्कम मिळाली आहे. तुम्ही १ रुपया भरला पण सरकारचा हिस्सा मित्राच्या कंपनी खात्यात जातोय, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

*शेतकऱ्यांना काही मिळत नाही अन् गद्दारांना खोके मिळतात*

शेतकऱ्यांकडून हमी पत्र लिहून घेत आहेत, हे शेतकऱ्यांना कळत नाही. समोरच्या जनतेत मला जगदंबा दिसत आहे. मोदींना वाटते नेते गेले पण पाळीव जनता त्यांच्या मागे जाईल मात्र असे होणार नाही, संकटाच्या छातीवर जाणारा महाराष्ट्र आहे. मोदींना शोभत नाही, तुम्ही देशाचे की, महाराष्ट्राचे पंतप्रधान आहेत. गुजराती बांधव आणि गुजरात विषयी मला काही बोलायचं नाही ते दुधात साखर विरघळून जाते तसे आपल्यात होते. मी त्यांना हुकूमशाह बोलतो. इथे शेतकऱ्यांना काही मिळत नाही, आणि गद्दारी करणाऱ्यांना खोके मिळतात. 

*आरएसएसमध्ये चांगले माणसं*

मी मागे इथे आलो होतो पाऊस पडत होता, त्याची काय मदत मिळाली. इथे शेतकऱ्यांना काही मिळत नाही. गद्दारांना खोके, राज्य सभा मिळते. शेतकऱ्यांना काय मिळाले? आरएसएसमध्ये चांगले माणसं आहेत, कुटंब सोडून बाहेर राहिले आणि त्यांच्या डोक्यावर असे भ्रष्ट आणि उपरे आणून बसवले आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.  

*निवडणूक आली की सबका साथ सबका विकास नंतर मित्राचा विकास*

आम्ही शिवभक्त आहोत, हिंदूची पालखी वाहू नतद्रष्ट भाजपची नाही. हे निर्लज्ज पुन्हा येतील, इथला खासदार तिकडे पाणी भरायला गेला. आता त्यांनी उभे राहायचे आपण त्यांना पाणी पाजू. निवडणूक आली की, पंतप्रधान येतील, मेरे पायरे भाईओ और बहनो, निवडणूक आली की सबका साथ सबका विकास नंतर मित्राचा विकास, असा टोला पंतप्रधान मोदींना लगावला आहे. 

*ज्याचा जास्त घोटाळा त्याला मोठे पद*

दिल्लीत शेतकऱ्यांवर अश्रुधूर सोडला तो आधीच रडतोय अश्रूधुर काय सोडतातय. मित्राची तुंबडी भरण्याची घाई झाली आहे. शिवसेनेचे 20-25 वर्ष सडले आहेत, हिंदू बरोबर मुस्लिम बांधव ही येतात ते म्हणतात तुमचं हिंदुत्व घरातील चूल पेटवणारे आणि भाजपाचे घर पेटवणारे हिंदुत्व आहे. भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या ही मोदी गॅरंटी आहे. फडणवीस यांची एक क्लिप आहे. आम्ही सर्वाना नाही घेत, फिल्टर लावले आहे. ज्याचा जास्त घोटाळा त्याला मोठे पद, यांचे हिंदुत्व भ्रष्ट हिंदुत्व आहे, असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे. मोठं मोठे राजे झुकले तिथे औरंगजेबासमोर ताठ मानेने उभे राहिलेल्या महाराजांप्रमाणे वागणार मोडेन पण वाकणार नाही, मोडणार नाही, पण दिलीश्वरांना झुकवून दाखविणार, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!