नेवासा
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील देशी दारुचे दुकान फोडून अज्ञात चोरटयानी ५० हजाराची दारूची चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
याबाबद अजीत अशोक मंडलीक (वय 42 वर्ष), रा. कुकाणा ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस स्टेशन फिर्याद दिली की,
माझे शेवगाव ते नेवासा जाणारे रोडवर चिलेखनवाडी शिवारात माझे मालकीचे सरकारमान्य देशी दारु विक्री केंद्र असून त्याचा परवाना क्रमांक सीएल-3/177 असा आहे. सदर दुकाणातुन दारुची विक्री करण्यासाठी माझा चुलत भाऊ सोमनाथ हरिभाऊ मंडलीक यास मैनेजर व त्याचे मदतीला चांगदेव बोरुडे, प्रकाश जगधने याना मंदतीसाठी ठेवलेले आहेत. सदरचे दुकान हे मेनेजर सोमनाथ हरिभाऊ मंडलीक हा रोज सकाळी 09 वाजता उघडून रात्री 09 वाजेचे सुमारास दुकानाला असलेले शटरचे दोन्ही कुलुपे लावुन बंद करत असतो. दि. 14/02/2014 रोजी सकाळी 09 वाजेचे सुमारास मला माझा मॅनेजर चुलतभाऊ सोमनाथ हरिभाऊ मंडलिक याचा फोन आला की मी दि. 13/02/2014 रोजी रात्री 09 वाजेचे सुमारास नेहमीप्रमाणे दुकाण बंद केले दूसरे दिवशी दि. 14/02/2024 रोजी सकाळी 09 वाजेचे सुमारास तो दुकान उघडण्यासाठी दुकाना समोर आला असता दुकाणाचे शटर हे अर्धवट उघडे दिसले. तेव्हा दुकाणात जावुन पाहीले तेव्हा दुकाणातील गोडावून मध्ये ठेवलेले देशी देशी संत्रा भींगरी कंपनीचे 16 बॉक्स व सी. सी. टी. व्ही. चा डिव्हीआर हा मला दिसुन आला नाही, असा फोन आल्याने मी लागलीच दुकानात गेलो. वत्यावेळी माझी खात्री झाली की कुणीतरी अज्ञात चोरटयानी माझं दुकाणाचे शटरचे कुलुपाचा कोयडा तोडुन दुकाणातुन 46 हजार 560 रुपये किमतीचे देशी संत्रा भिंगरी कंपनीचे 16 सिलबंद बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये 180 मीलीच्या 48 कॉटर असलेला व प्रत्येकी बॉक्सची किमत 2 हजार 910 रुपये
असलेली त्याचा बंच नंबर 1837 असा असलेला व 5 हजार रुपये किमतीचा एक काळे रंगाचा डिव्हीआर असा एकूण
51 हजार 560 रुपये किमतीचा माल
अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे.तसेच दुकाना पासुन जवळच असलेले कुकाना गावातील मारुती मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात असलेली दानपेटी कशाने तरी तोडुन त्यातील ऐवज चोरुन नेला आहे म्हणून माझी त्या अज्ञात चोरटयाविरुध्द फिर्याद आहे.
या फिर्यादिवरुन नेवासा पोलीस ठाण्यात
अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.