Sunday, October 6, 2024

मोठी बातमी:मविआचं जागावाटप तिढा सुटला ? लवकरच घोषणेची शक्यता

माय महाराष्ट्र न्यूज:आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे भाजपने महाविकास खिळखिळी करण्यासाठी

नेत्यांची फोडाफोडी सुरु केली आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्येही महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागावाटपाची आपली चर्चा नेटाने सुरु ठेवली आहे. याच चर्चेमधून आता लोकसभेच्या

दोन जागांवरुन निर्माण झालेला तिढा सुटला आहे. त्यानुसार रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून लढवली जाईल. या जागेवरुन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे

रावेरमध्ये एकनाथ खडसे आणि भाजपकडून त्यांची सून रक्षा खडसे, यांच्यात लढत रंगू शकते. तर जळगाव लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला मिळाला आहे. या दोन्ही जागा कोणी लढवायच्या, याबाबत

महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांमध्ये एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे.कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अंतिम चर्चा पूर्ण होऊन कोणाला कोणत्या जागा मिळाल्या हे जाहीर

करण्यात येईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट कोणत्या जागा लढवणार, याबाबत असलेला सस्पेन्स लवकरच संपुष्टात येणार आहे. मविआच्या

घटकपक्षांमध्ये फार पूर्वीच लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु झाली होती. एकूण ४८ जागांपैकी ४० जागांवर मविआच्या घटकपक्षांमध्ये अगोदरच एकमत झाले आहे. तर उर्वरित 8 जागांचा तिढा अद्याप कायम आहे. या जागांमध्ये रामटेक,

हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी यांचा समावेश आहे. याशिवाय, काँग्रेस पक्ष मुंबईतील दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम या दोन मतदारसंघांसाठी आग्रही आहे. परंतु, या दोन्ही जागा २०१९ मध्ये

शिवसेनेने जिंकल्या होत्या. त्यामुळे राज्यातील इतर दोन जागांच्या मोबदल्यात ठाकरे गट मुंबईतील या जागा सोडण्यास तयार होणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!