Wednesday, August 17, 2022

सोयाबीन लागवड करताना रुंद वरंबा-सरी पद्धत तंत्र वापरावे-डॉ. ढगे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा-सरी पद्धत तंत्र अवलंबावे असे आवाहन कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केले.

तालुक्यातील प्रवरा संगम येथे शेतकरी दीपक रेलकर यांच्या शेतावर महाराष्ट्र शासनाच्या कृषि खात्यामार्फत राष्ट्रीय सुरक्षा अन्न अभियान व गळित धान्य प्रकल्प अंतर्गत सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी पद्धत तंत्र वापरण्यासाठी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक घेण्यात आले.

त्यावेळी डॉ.ढगे बोलत होते.मंडळ कृषी अधिकारी मनोज सूर्यवंशी,कृषी अधिकारी लक्ष्मण सुडके,कृषी पर्यवेक्षक निवृत्ती भागवत,भीमराव चिंधे,कृषी सहाय्यक श्रीमती वैशाली काकडे आदी उपस्थित होते.

डॉ.ढगे पुढे म्हणाले,जिथे 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाला असेल तेथेच सोयाबीनची पेरणी करावी. काही भागात अद्याप शेतकरी पावसाची वाट पाहत आहे तर काही ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला आहे.सोयाबीनसाठी ट्रॅक्टरवर चालणारे पेरणी यंत्र वापरावे.

पेरणी करताना मध्ये गादी वाफा व दोन्ही बाजूला सरी काढल्यामुळे मूलस्थानी जलसंधारण चांगले होते. कमी पाणी असल्यावर गादीवाफ्यामुळे ओलावा टिकतो तर जास्त पाणी झाल्यास सरीमधून पाण्याचा निचरा चांगला होतो.

कृषी अधिकारी मनोज सूर्यवंशी म्हणाले,सोयाबीन हे खरिपातील सोयाबीन महत्त्वाचे पीक आहे. त्यासाठी बहुउपयोगी तंत्र शेतकऱ्यांनी अवगत करावे.
कृषी अधिकारी लक्ष्मण सुडके म्हणाले, अपेक्षित रोप संख्या ठेवल्यामुळे उत्पादनात वाढ होते.आंतर मशागत करणे सोपे जाते.

कृषी पर्यवेक्षक निवृत्ती भागवत म्हणाले, दोन ओळीतील अंतर 16 ते 18 इंच व 6 फुटाचा गादी वाफा तयार करावा. एकोणावीस शेतकऱ्यांना 10 हेक्टर क्षेत्रासाठी फुले संगम जातीचे बियाणे प्रवरासंगम गावासाठी पुरवण्यात येणारआहे.
कृषी सहाय्यक श्रीमती वैशाली काकडे यांनी सर्वांचे आभार मानले

ताज्या बातम्या

error: Content is protected !!