नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुका काँग्रेस पक्षाची बदनामी होईल अशा प्रकारचे लिखाण करून,बदनामीकारक मजकूराची बातमी वजा पोस्ट तयार करून ती पेपरला न देता व्हाट्सएपच्या ,फेसबुक या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसचे नेवासा तालुका अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की,
दि.10 जून 2021 रोजी मी नेवासा तालुक्यात वडाळा बहीरोबा येथे रेमडीसीयर इंजक्शनची बोगस विक्री चालु आहे त्याचेवर कार्यवाही करावी कार्यावाही झाली नाही तर कॉग्रेस पक्षातफे रस्ता रोको आदोलन करण्यात येईल असे निवेदन पोस्टे महसुल विभाग याना देण्यात आले होते. त्यावरुन शनिशिगनापुर पोलीस स्टेशन यांनी इंजेक्शन विकनाराचा शोध घेवुन त्याचेवर गुन्हे दाखल करुन त्याना अटक केली आसल्याने व आमचे समाधान झाल्याने आमचे रस्ता रोको आन्दोलन स्थगित करण्यात आले आहे.
तरी दि.9 जून 2021 राजी सायकाळी 5.00 वाजेचे सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वर्तमानपत्रात देण्यात आले आहे अशा अशयाचा मजकुर वजा बातमी सारखी माहीती छापुन “परीवर्तन ग्रुप उस्थळ दुमाला व इतर या वायरल ग्रुप” वर प्रसारीत करून कॉग्रेस पक्षाची बदनामी केली म्हणुन माझी फियाद आहे.
या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा रजि नं. 521/2021 भादवी कलम 500 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नेवासा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी माळवदे व काँग्रेस कमिटीचे सदस्य यांनी पोलीस निरीक्षक विजय करे यांची भेट घेऊन सदर गुन्ह्याचा तपास तातडीने करून खोडसाळ व्यक्ती त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.
* तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासाठी ,न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाने नेहमीच आक्रमक भूमिका घेवून ते सोडविण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर पोस्ट टाकून किंवा ईतर कितीही खोडसाळपणा करून आमच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी लोकांसाठी आम्ही तत्पर राहून कार्य करीतच राहणार.
– संभाजी माळवदे
अध्यक्ष,नेवासा तालुका काँग्रेस कमिटी