Thursday, December 12, 2024

नेवासा विधानसभेकरिता ८० टक्के मतदान

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

२२१ नेवासा विधानसभे करिता ७९.७९ टक्के मतदान झाले असून एकूण २ लाख ८३ हजार १११ मतदारांपैकी २ लाख २५ हजार ९०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून शंकरराव गडाख, विठ्ठलराव लंघे, बाळासाहेब मुरकुटेंसह १२ उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद झाले आहे.

नेवासा विधानसभा मतदारसंघात बुधवारी २० नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान झाले.
सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली.सकाळी सुरुवातीला मतदानाचा वेग कमी होता.सकाळी ९ वाजे पर्यंत २१८८१ ( ७.७३ टक्के),११ वाजे पर्यंत ६३०५४(२२.२७ टक्के), दुपारी १ वाजे पर्यंत १०९२९५ (३८.६ टक्के), दुपारी ३ वाजेपर्यंत १५४९८५ (५४.७४ टक्के),
सायं ५ वाजेपर्यंत १,९९,५५४ (७०.४९ टक्के).

*भेंडा बुद्रुक येथील मतदान..
भेंडा बुद्रुक येथे बूथ क्रमांक 194 वर 1112 पैकी 827,बूथ क्रमांक 195 वर 1058 पैकी 746, बूथ क्रमांक 196 वर 1013 पैकी 799, बूथ क्रमांक 197 वर 349 पैकी 200, बूथ क्रमांक 198 वर 1257 पैकी 869 बूथ क्रमांक 199 वर 595 पैकी 261 असे एकूण 5384 पैकी 3703 (68.77 टक्के) मतदान झाले.

*भेंडा खूर्द एकूण मतदान…
बुथ क्रमांक ११३ वर ९९६ पैकी ७२४,
बूथ क्रमांक ११४ वर १२९८ पैकी १०१८ असे एकूण १७४२(७५.९३ %) मतदान

*कोणत्या उमेदवाराच्या गावात कीती मतदान…
उमेदवार शंकरराव गड़ाख यांच्या सोनई गावात १६८४१ पैकी १२६०९ (७४.८७ टक्के) मतदान झाले, विठ्ठलराव लंघे यांच्या गावात शिरसगाव मध्ये ३३९० पैकी २७५३ (८१.२० टक्के) मतदान झाले तर बाळासाहेब मुरकुटे यांच्या गावात देवगांव मध्ये ३९८२ पैकी ३०७२
(७७.२५ टक्के) मतदान झाले आहे.

*देवगाव, देडगाव सह इतर काही गावांमध्ये रात्री उशिरा पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कडून उशीरा पर्यंत अधिकृत आकडेवारी मिळू शकलेली नाही.
मात्र राजकिय पक्षांचे मतदान प्रतिनिधी कडून मिळालेल्या माहिती नुसार
नेवासा तालुका पंचायत समिती गण निहाय एकूण मतदान व झालेले मतदान असे…
——————————————
अ.नं.–गणाचे नाव–बुथ संख्या–एकूण मतदार संख्या–झालेले मतदान–टक्केवारी
——––———————————-
१)सोनई–२०–२०२५८–१५२९३–७५.४९ टक्के

२)घोडेगाव–२१–१९६६१– १५९४४–८१.०९ टक्के

३)चांदा–१७–१७८८८–१४४०३– ८०.५१ टक्के

४)देडगाव–१७–१७९२१– १४१८५–७९.१५ टक्के

५)खरवंडी–१७–१८०७८–१४२८२–७९.०० टक्के

६)करजगाव–२२–२०३७६– १६८७३– ८२.८० टक्के

७)भानसहिवरा–१७–१८२१०–१४२८७– ७८.४५ टक्के

८)पाचेगाव–२०–१९८८०–१५७६१–७९.२८ टक्के

९)बेलपिंपळगाव–१९–१८३४६–१५२७८– ८३.३१ टक्के

१०)सलाबतपूर–१९–१८९३४– १५६२१– ८२.५० टक्के

११)कुकाणा–१८–२०३९६–१६०९९– ७८.९३ टक्के

१२)शिरसगाव–२०–१९७५१–१६४७१–८३.३९ टक्के

१३)भेंडा बु.–१७–१७४१६–१३२५७– ७६.११ टक्के

१४)मुकिंदपुर(दुपारी ४ पर्यंत) –१७–१७२८४–१२२११–७०.६५ टक्के

१५)नेवासा नगर पंचायत–१५–१८४७०–१३४२३– ७२.६७ टक्के
————————————————
एकुण– २७६–२,८३,१११–२,२३,३८८–७८.९० टक्के
————————————————–

*उमेदवारांचे मतदान…*

शिवसेना(उबाठा) उमेदवार शंकरराव गडाख यांनी सोनई येथे मतदानाचा हक्क बजावला. एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी शिरसगाव येथे तर प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांनी देवगाव येथे मतदानाचा हक्क बजावला.


*निवडणूक रिंगणातील उमेदवार…*

नेवासा विधानसभा मतदारसंघात शंकरराव यशवंतराव गडाख (शिवसेना उबाठा),विठ्ठल वकिलराव लंघे (शिवसेना), हरिभाऊ बहिरु चक्रनारायण
(बहुजन समाज पार्टी),
पोपट रामभाऊ सरोदे (वंचीत बहूजन आघाडी), बाळासाहेब उर्फ दादासाहेब दामोधर मुरकुटे (प्रहार जनशक्ती पक्ष),कांबळे ज्ञानदेव लक्ष्मण (अपक्ष),जगन्नाथ माधव कोरडे(अपक्ष),मुकुंद तुकाराम अभंग(अपक्ष),वसंत पुंजाहारी कांगुणे(अपक्ष),शरद बाबुराव माघाडे(अपक्ष),सचिन प्रभाकर दरंदले(अपक्ष),ज्ञानदेव कारभारी पाडळे(अपक्ष) हे १२ उमेदवार निवडणुक रिंगनात होते.
शंकरराव यशवंतराव गडाख (शिवसेना उबाठा), विठ्ठलराव वकिलराव  लंघे (शिवसेना) व  बाळासाहेब उर्फ दादासाहेब दामोदर मुरकुटे (प्रहार जनशक्ती पक्ष) या तीघांमध्ये अत्यंत चुरशिची निवडणुक झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे,
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार संजय बिरादार, निवडणूक नायब तहसीलदार किशोर सानप, माध्यम समन्वयक संदीप गोसावी हे निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.
——————————–
*पोलिसांचा चोख बंदोबस्त…

पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांचे नेतृत्वाखाली पोलिस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला,तालुक्यात कुठे ही अनुचित प्रकार घडलेला नाही.देवगाव येथील मतदान केंद्रावर विशेष केंद्रीय सशस्र सुरक्षा बलाच्या जवानांची नेमणुक करण्यात आली होती.संपूर्ण मतदार संघात पोलिसांची सकाळी ७ ते सायं.६ पर्यंत अविरत पेट्रोलिंग सुरू होती.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!