Thursday, November 21, 2024

पोलिस बंदोबस्तात ४० बसेस व ७ जीप मधून मतदान केंद्रावर पथके रवाना

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

२११ नेवासा विधानसभा मतदार संघासाठी उद्या बुधवार दि.२० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी ४० बसेस व ७ जीप मधून मतदान केंद्रावर पथके पोलिस बंदोबस्तात पोहच झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांनी दिली.

नेवासा विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार निवडणूक लढवीत असून एकूण २ लाख ८३ हजार १११ इतके मतदार आहेत. यात १,४५,९२७ पुरुष मतदार, १,३७,१८० स्री मतदार, ४ तृतीय  पंथीय मतदार व ३७८ सर्व्हिस वोटर आहेत.
मतदानादिवशी पहाटे साडेपाच वाजता सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोलची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल.

२२१ नेवासा विधानसभा मतदारसंघातील
१३४ ठिकाणी २७६ मतदान‌ केंद्रा मधून मतदान होणार आहे.
त्यासाठी लागणारे साहित्य वितरण मंगळवारी झाले. साहित्य वितरणासाठी २० टेबलवर १२५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.कर्मचारी व निवडणूक साहित्य मतदान केंद्रावर पोहच करण्यासाठी एसटी महामंडळाच्या ४० बसेस व ७ जीपची व्यवस्था करण्यात आली होती. १८२४ मतदान कर्मचारी या करिता नेमण्यात आलेले आहेत.
१३८ मतदान केंद्राचे लाईव्ह वेबकॉस्टींग करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील पडद्यावर (स्क्रीनवर) ही लाईव्ह वेब कास्टिंगच्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबर रोजी २०२४ रोजी सकाळी ५.३० वाजेपासून राखीव कर्मचाऱ्यांची टीम क्षणा – क्षणाला मतदान केंद्रावरील हालाचालींवर बारीक लक्ष ठेवणार आहेत.

साहित्य वितरणवेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार संजय बिरादार, निवडणूक नायब तहसीलदार किशोर सानप, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, माध्यम समन्वयक संदीप गोसावी उपस्थित होते.

*पोलीस यंत्रणा*

१ पोलिस उपअधीक्षक, ३ पोलिस निरीक्षक, १२ सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक, २२५ पोलीस कर्मचारी, २६४ होमगार्ड व १२ हाफ सेकशन केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल कर्मचारी व ६ मायक्रो ऑब्जवर.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!