Wednesday, January 22, 2025

नेवासा विधानसभेकरिता २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज-अरुण उंडे

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

२२१ नेवासा विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदाना करिता यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांनी दिली आहे.

नेवासा तहसील कार्यालयात झालेल्या
पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना
निवडणुक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांनी सांगितले की, नेवासा विधानसभे करिता १,४५,९२७ पुरुष मतदार, १,३७,१८० स्री मतदार, ४ तृतीय पंथीय मतदार व ३७८ सर्विस वोटर असे एकूण २ लाख ८३ हजार १११ मतदार आहेत.
बुधवार दि.२० रोजी होत असलेल्या मतदानासाठी २७६ मतदान केंद्र असून १८२४ कर्मचारी नेमाण्यात आलेले आहे.
कर्मचारयाना शासकीय गोडावून येथून साहित्य वाटप केले जाणार आहे. मतदान केंद्रा पर्यंत कर्मचारी व निवडणुक साहित्य पोहच करणे व मतदाना नंतर पुन्हा अनण्याकरिता एसटी महामंडळाच्या ४० बेसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तालुक्यात १३८ संवेदनशील मतदान केंद्र असून तेथे वेबकास्टिंग केले जाणार आहे. तर भेंडा फॅक्टरी (केंद्र क्रमांक १९९) , मुळा कारखाना (मतदान केंद्र १५४) व नेवासा खुर्द (केंद्र क्रमांक ४२) हे तीन आदर्श मतदान केंद्रे आहेत. मुकिंदपुर ५६ हे सखी मतदान केंद्र आहे.
सुंदरबाई विद्यालय ५२ हे युवा मतदान केंद्र तर नेवासा खुर्द ४३ हे दिव्यांग मतदान केंद्र असणार आहे.
मतदानाची वेळ ही सकाळी ७ ते  सायं. ६ वाजेपर्यंत राहील. मतदान केंद्राचे १०० मीटर परिसरात मोबाईल बंदी असणार आहे.मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी या करिता १ उपाधिक्षक, ३ पोलिस निरीक्षक , १२ सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक,२२५ पोलिस, २६४ होमगार्ड व १२ सीएपीएफ असा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तालुक्यातील प्रमुख गाव/शहरातून रुट मार्च ही करण्यात आलेला आहे.

पत्रकार परिषदे प्रसंगी नेवासा नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सोनाली मात्रे व माध्यम समन्वयक संदीप गोसावी हे उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!