Thursday, December 12, 2024

मतदान जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा-अरूण उंडे

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा, असे प्रतिपादन नेवासा निवडणूक निर्णय अधिकारी अरूण उंडे यांनी केले.

स्वीप अंतर्गत नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूल येथे आयोजित मतदार जागृतीच्या विविध उपक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजय बिरादार, नायब तहसीलदार किशोर सानप, गट विकास अधिकारी संजय लखवाल, गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड, प्राचार्य कीर्ती बंग, प्राचार्य, स्मिता पानसरे, प्राध्यापिका साक्षी रेडे , शिक्षण विस्तार अधिकारी शेख रुकसाना, विषय तज्ज्ञ शेख समी आदी उपस्थित होते.

श्री.उंडे म्हणाले की, मुख्याध्यापक- शिक्षक-विद्यार्थी-पालक अशी साखळी तयार करून निवडणूकसंबंधी माहिती मतदारांपर्यंत लवकर पोहोचवता येते. हे एक प्रभावी माध्यम आहे. लोकशाहीत मतदानाला असलेले महत्त्व सर्वांना समजावे आणि प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मतदार‌ जागृतीसाठी ज्ञानोदय इंग्लिश स्कूल येथून सायकल रॅली काढण्यात आली. रॅली नगरपंचायत चौक मार्गे परत ज्ञानोदय इंग्लिश स्कूल येथे आली. यावेळी एकत्र मानवी साखळी तयार करून ‘वोट फोर इंडिया’ हा संदेश देण्यात आला. रॅलीत ठिकठिकाणी सोनई किड्स किंगडम शाळा व ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य व समूहगीते सादर केली. सुंदरबाई कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून मतदान जागृती बाबत संदेश दिला. रॅली समारोपात विद्यार्थी व शिक्षकांना मतदानाची शपथ देण्यात आली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!