Thursday, December 12, 2024

नेवासा विधानसभा मतसंघात १५७ मतदारांनी केले गृहमतदान

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा विधानसभा मतदारसंघात आजपासून गृह मतदानास (होम वोटिंग) सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी १५७ मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ८५ वर्षांवरील १३६ ज्येष्ठ नागरिक, तर २१ दिव्यांग मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ८५ वर्षांवरील व दिव्यांग नागरिक जे मतदान केंद्रापर्यत पोहोचू शकत नाही अशा मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी नमूना १२ डी भरून घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

नेवासा मतदारसंघासाठी गृह मतदानासाठी १९४ मतदारांनी नोंदणी केली आहे. १४ व १५ नोव्हेंबर या कालावधीत गृह मतदान होणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान‌ अधिकारी व‌ सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश असलेल्या ११ पथकांच्या माध्यमातून गृह मतदान मोहीम राबविण्यात येणार आहे. गृह‌ मतदानांसाठी टपाली मतपत्रिकेचा वापर करण्यात येणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी अरुण ऊंडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी तथा समन्वयक अधिकारी संजय लखवाल,‌ नायब तहसीलदार किशोर सानप गृह मतदान‌ प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!