राहुरी/प्रतिनिधी
राहुरी हद्दीतून बुऱ्हाणपूर ,मध्यप्रदेश येथे चोरीचे चंदन घेऊन जाणारी आंतरराज्यीय चंदनतस्कर टोळी श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचे पथकाने
जेरबंद केली असून या टोळीकडून 650 किलो चंदनासह 71 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी दोघाना अटक करण्यात आली आहे.
याबाबद अधिक माहिती अशी की, आज दि. 12/06/2021 रोजी Dy.s.p.संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, केरळ राज्यातील चंदन तस्कर टोळी राहुरी हद्दीतून बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश येथे चोरीचे चंदन घेऊन जाणार आहे. मिळालेल्या माहितीवरून राहुरी कारखाना येथे सापळा लावून छापा टाकला असता अंदाजे 61 लाख रुपये किमतीचे चंदन (650 किलो चंदन प्रति किलो 9500 ₹ प्रमाणे) आणि 10 लाखाचे वाहन असा एकूण 71 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी अब्दुल मोहम्मद निसाद (वय 32 वर्षे) राहणार अंजामैल हाऊस ता. बैदाडका. जिल्हा कासारगुड, केरळ व अब्दुल फक्रुद्दीन रहमान (वय 41 वर्ष) रा. अमितकला हाऊस ता. ऐनमाकजा जिल्हा कासारगुड केरळ या दोघांचेविरुध्द राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे, उपनिरीक्षक निलेश कुमार वाघ, स. फौ.राजेंद्र आरोळे, पो.हे.कॉ.सुरेश औटी, पो. ना.जानकीराम खेमनर, पो. कॉ. गणेश फाटक, किशोर जाधव, सुनील दिघे, राहुल नरोडे, होमगार्ड तुषार बोराडे, रमेश मकासरे आदींनी केली.