Monday, October 14, 2024

आर अश्विन बाहेर: इंडिया तिसरी कसोटी दहा खेळाडूंवरच खेळणार, कारण ‘हा’ नियम

माय महाराष्ट्र न्यूज:भारत आणि इंग्लंडमध्ये राजकोटमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात टि्वस्ट निर्माण झाला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्यापूर्वी

भारतीय संघासमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. सामन्याचे उर्वरित दिवस भारतीय संघाला अकरा ऐवजी दहा खेळाडूंसह खेळावे लागणार आहे. भारताचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा

दुसऱ्या दिवसानंतर सामन्यातून बाहेर पडला आहे. रविचंद्रन अश्विन याने शुक्रवारी 500 गडी बाद करण्याचा टप्पा गाठला होता. त्यानंतर त्याला कौटुंबिक कारणामुळे सामना सोडावा लागत आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही महिती दिली.तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व निर्माण केले होते. ज्या बेसबॉलची सातत्याने चर्चा होत होती,

त्याचेच खऱ्या अर्थाने दर्शन शुक्रवारी राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी झाले. शनिवारी इंग्लंडचा संघ बेसबॉल शैलीने खेळत राहिल्यास भारतासमोर संकट निर्माण होणार आहे. कारण आता भारताकडे रविचंद्रन अश्विन

नसणार आहे. यामुळे चार गोलंदाजांवर भारताला खेळावे लागणार आहे. तसेच तिसऱ्या दिवशी टीम इंडिया प्लेइंग इलेवनमधील 10 खेळाडूंसोबतच मैदानात उतरणार आहे. भारताला सब्सीट्यूट खेळाडू घेता येणार आहे.

परंतु तो गोलंदाजी करु शकणार नाही.रविचंद्रन अश्विनचे संघात नसल्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय संघ केवळ चार गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. फिरकी आक्रमणाची

जबाबदारी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यावर आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज वेगवान आक्रमणाची धुरा सांभाळतील. भारताला फक्त मैदानावर फिल्डिंगसाठी बदली खेळाडू मिळेल.

अश्विन याने कौटुंबिक कारणांमुळे मैदान सोडले आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे त्याच्या जागी बदली खेळाडू टीम इंडियाला मिळणार नाही.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!