Monday, May 27, 2024

श्रेयसी देशमुख या विद्यार्थ्यांनीने केला अनाथ मुलां बरोबर वाढदिवस साजरा

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा फॅक्टरी येथील कु.श्रेयसी अजय देशमुख या विद्यार्थिनीने ब्राह्मणी (ता.राहुरी) येथील श्री.मोहन सर्जेराव शिंदे संचलित राजश्री छत्रपती शाहू महाराज निवासी वसतिगृहातील अनाथ मुलांच्या वसतिगृहात आपला सोळावा वाढदिवस साजरा केला.

वसतिगृहाचे चालक श्री. मोहन शिंदे म्हणाले की,आपण आपल्या मित्र परिवार, नातेवाईकांबरोबर वाढदिवस साजरे करत असतो, परंतु अनाथ निराधार मुलांबरोबर वाढदिवस साजरा करून त्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे हे खूप मोठे काम आहे. अनाथ मुलांबरोबर असे उत्साह वर्धक कार्यक्रम इतरांनीही घेऊन अनाथ मुलांना प्रेम द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थिनी श्रेयसी देशमुख म्हणाली की,
मी सेंट मेरीज स्कूल, नेवासा या शाळेची विद्यार्थिनी असून शाळेने आम्हाला रक्षा बंधनच्या वेळी या वसतीगृहामध्ये आणले होते. तो सण आम्ही या मुलांबरोबर साजरा केला होता. तेव्हाच मी माझा वाढदिवस या मुलांसोबत साजरा करण्याचे ठरविले होते व आज दि. १६ फेब्रुवारी रोजी माझा वाढदिवस मी या अनाथ मुलांबरोबर साजरा केला. वाढदिवसाचा केक भरवताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप समाधान वाटले.
यावेळी मुलांना खाऊ, चॉकलेट वाटप करण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!