माय महाराष्ट्र न्यूज:कापसाच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक तसेच उत्तर भारतातील बाजारात ही सुधारणा झाली होती. कापसाचे भाव क्विंटलमागं
अनेक बाजारात १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान वाढले होते. तसेच यापुढील काळात कापसाचे भाव कापसाची बाजारातील आवक आणि मागणी यावर अवलंबून राहतील, असे अभ्यासकांनी सांगितले.
देशातील बाजारात होणाऱ्या कापसाच्या आवकेचा विचार केला तर १ लाख ३७ हजार गाठी कापूस विक्रीसाठी आला होता. म्हणजेच बाजारातील आवक ७ लाख गाठींनी कमी झाली.
या आकेत महाराष्ट्र आणि गुजरातचाच वाटा ८७ लाख गाठी होता. त्यातही माहाराष्ट्रातील बाजारात झालेली आवक सर्वाधिक होती. महाराष्ट्रातील बाजारात ४७ लाख गाठी कापूस विक्रीसाठी आला होता.
तर गुजरातमध्ये ४० लाख गाठी कापूस विकला गेला. देशातील इतर राज्यांमधील आवक ५० हजार गाठींच्या दरम्यान होती, असे काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने स्पष्ट केले.दराचा विचार केला तर देशातील
बहुतांशी बाजारांमध्ये आज क्विंटलमाग १०० ते २०० रुपयांची वाढ झाली होती. कापसाच्या कमाल आणि सरासरी भावपातळीत ही वाढ दिसून आली. किमान भाव अजही बहुतांशी बाजारांमध्ये
६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यानच दिसले. सरासरी भावपातळी ६ हजार ७०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होते. गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर भारतातही हा भाव मिळाला. तर राज्यातील
सर्वाधिक भाव ७ हजार ५०० रुपये होता. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत हा भाव मिळाला.कापसाचे भाव देशातील काही बाजारात वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारातील
भावही वाढत आहेत. त्यामुळे देशातील कापसाचे भाव पुढील काळात आणखी वाढतील. पुढच्या दोन आठवड्यापर्यंत कापूस सरासरी ७ हजारांचा टप्पा पार करेल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.