Monday, May 20, 2024

महाराष्ट्र एक्स्प्रेस बुधवारी पुण्यापर्यंतच धावणार

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे आणि मिरज विभागातील तारगाव, मसुर आणि सिरवडे स्थानकांदरम्यान दुहेरीकरण

सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करण्यात येणार असल्याने २१ व २२ फेब्रुवारी या कालावधीत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट ,

तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. यामध्ये अकोला मार्गे धावणारी गोंदीया-कोल्हापुर महाराष्ट्र एक्स्प्रेस बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी पुणे स्थानकापर्यंतच जाणार असल्याने कोल्हापुरला

जाणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक २१ फेब्रुवारी

रोजी पुणे स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. ही गाडी पुणे ते कोल्हापूर दरम्यान रद्द राहील. तर ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक २२ फेब्रुवारी रोजी पुणे स्थानकांपासून

आपल्या नियोजित वेळेत सुटेल. ही गाडी कोल्हापूर ते पुणे दरम्यान रद्द राहील.निजामुद्दीन -यशवंतपूर एक्स्प्रेस दौंड मार्गे १२६३० हजरत निजामुद्दीन -यशवंतपूर एक्स्प्रेस प्रवास सुरु दिनांक २१ फेब्रुवारी रोजी दौंड,

पंढरपूर , मिरज मार्गे वळवली जाईल. १२७८० हजरत निजामुद्दीन- वास्को दि गामा गोवा एक्स्प्रेस २२ फेब्रुवार रोजी दोन तास नियमन केले जाईल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!