Monday, February 10, 2025

रोहित पवारांचे मोठं विधान म्हणाले मी कर्जत जामखेडला……

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आमदार रोहित पवार हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

या चर्चेवर आमदार रोहित पवारांनी भाष्य केलं आहे.आमदार रोहित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले, ‘पुण्यातील आंबेगावमधील पदाधिकारी अनेक वेळा शरद पवारांकडे आले.

आंबेगावमध्ये सभा घेण्याची विनंती केली. आता आंबेगावमधील सभा मोठी होणार आहे. आता सबेला जायचं नाही म्हणून अनेकांना धमक्यांचे फोन आले आहेत. नागरिकांनी ही सभा घेतली आहे.

त्यामुळे सभेला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे.आढळराव पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, ‘

माजी खासदार आढळराव पाटी यांना म्हाडाचे अध्यक्ष पद मिळाले. लोकसभेच्या अगोदर एखादे पद मिळाले तर ती व्यक्ती उमेदवार राहत नाही. अजित पवार यांच्या घरातील काही लोक शिरूरमध्ये

देवदर्शनासाठी येवून गेली. त्यामुळे आता पार्थ पवार मावळ नाही तर शिरूरमधून निवडणूक लढविणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र शिरूरमधून अमोल कोल्हे हेच निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे’.

लोकसभा निवडणूक लढण्याविषयीच्या चर्चेवर रोहित पवार म्हटले, ‘मी आमदारकीसाठी उभा राहायच्या आधी मी शिरूरमधून लोकसभा लढविणार अशी चर्चा होती. आताही चर्चा आहे.

मात्र, मी कर्जत जामखेडला सोडणार नाही. मला त्यांनी लढायला शिकविले, त्यांच्यामुळे माझी ओळख राज्यात झाली.मी आमदारकीच लढविणार आहे. मात्र आपल्या विचाराचे खासदार निवडून आणण्यासाठी कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे’.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!