माय महाराष्ट्र न्यूज:छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ६ वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी
शेतकरी शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नस समाविष्ट असलेले शिधाजिन्नस संच ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त
सदर धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. ई-पॉस प्रणालीद्वारे शंभर रुपयांमध्ये प्रतिसंच या सवलतीच्या दराने आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येईल.एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल, चणाडाळ, रवा, मैदा व पोहा
प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे या सहा वस्तूंचा समावेश असलेला संच ‘आनंदाचा शिधा’ म्हणून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
एक शिधाजिन्नस संच प्रती शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे शंभर रुपये या दराने वितरीत करण्यात येईल.