माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना मिळणार पोषण आहारात हे शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करण्याबाबतचा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालय
विभागाने सोमवारी (ता. १२) जारी केला. राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना पोषण आहारात बेदाणा समावेश करण्याबाबत शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी निर्देश दिले आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील बेदाणा बाजारपेठेला मोठी चालना मिळणार आहे.शालेष पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, द्राक्ष बागायतदार संघ,
व्यापारी आणि विविध संघटनांनी मागणी केली होती. त्यानुसार ऑगस्ट २०२३ मध्ये बेदाणा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, यासदंर्भात अंमलबजावरणी
झाली नव्हती. त्यामुळे आदेशाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती.सोमवारी (ता. १२) पंतप्रधान पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी पूरक आहारात बेदाण्याचा समावेश करण्याबाबतचा
आदेश प्राथमिक शिण संचालनालय यांनी काढला. २०११ पासून आठवड्यातून एक दिवस पूरक आहार म्हणून फळे, सोयाबिस्किट, दूध, चिक्की, राजगीरा लाडू, गूळ, शेंगदाणे, चुरमुरे दिले जातात.
याबरोबरच बेदाणाही आठवड्यातून एक दिवस देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात सुमारे दीड लाख टन बेदाण्याचे उत्पादन होते. बेदाण्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
त्यामुळे त्याचे ब्रॅंडिग आणि विक्री करणे सोपे होईल. शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश झाल्याने बेदाण्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली असून बेदाण्याचा चांगला उठाव होणार आहे.