Thursday, February 12, 2026

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनो परीक्षा जाण्याआधी ही बातमी वाचाच…

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आता लवकरच सुरूवात होणार आहे. सर्वत्र परीक्षेचे वातावरण बघायला मिळतंय. दहावी बारावीच्या परीक्षांसाठी राज्य माध्यमिक व उच्च

माध्यमिक मंडळ देखील सज्ज झाल्याचे बघायला मिळतंय. या परीक्षांची जय्यत तयारी देखील सुरू आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीची

जवळपास तयारी पूर्ण झाल्याचे देखील बघायला मिळतंय. राज्य भरात या परीक्षांसाठी कर्मचारी देखील तैनात केले जाणार आहेत.दहावी बारावीच्या परीक्षांसाठी 1 लाख 80 हजार कर्मचारी तैनात करण्यात

आले आहेत. सर्व परीक्षा या सुरळीत पार पडण्यासाठी मंडळाकडून प्रयत्न ही केली जात आहेत. यंदा बारावीचे 15 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीचे 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

हा आकडा खरोखरच खूप जास्त मोठा आहे. यामुळेच मंडळाने जोरदार तयारी केलीये.दहावी आणि बारावीचे एकून मिळून 31 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षांची आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाल्याची

माहिती बोर्ड प्रशासनाकडून देण्यात आलीये. आता या परीक्षांना अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. बारावीची परीक्षा तर याच महिन्यापासून सुरू होतंय. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होतंय.

दुसरीकडे दहावीची परीक्षा ही 1 मार्च 2024 पासून होणार सुरू होत आहे. राज्यभरातील परीक्षा केंद्रावर देखील तयारी पूर्ण झालीये. बारावीच्या परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येत आहेत.

दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आकडा मोठा आहे.यंदाची परीक्षा ही काॅपी मुक्त करण्यासाठी देखील प्रशासनाकडून पाऊले ही उचलली

जात आहेत. मागील काही वर्षांपासून राज्यात काॅपी मुक्त परीक्षा घेण्यावर प्रशासनाचा भर दिसतोय. काॅपी मुक्त परीक्षा घेण्यासाठी तगडा बंदोबस्त

 

प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर ठेवण्यात आलाय. दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी ही जवळपास आता पूर्ण झालीये.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!