माय महाराष्ट्र न्यूज:आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये सुखी वैवाहिक आयुष्याचेही काही मंत्र दिले आहेत. अशाच मंत्रांपैकी हे काही मंत्र.
ज्यात त्यांनी कपलला रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर काही गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे.नवरा-बायकोनं रात्रीचं जेवण एकत्र करावं. शक्य असेल तर दोघांनी एकमेकांना आपल्या
हातांनी भरवावं. असं केल्यानं दोघांमध्ये प्रेम वाढतंच. सोबतच एकमेकां प्रती सन्मान आणि आत्मविश्वासही वाढतो.जोडीदाराच्या इच्छेकडे कधीच दुर्लक्ष करू नका. असं केल्यानं तुमच्यातील
दुरावा वाढू शकतो. त्यामुळे अशी चूक होणार नाही, यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.नवरा-बायकोने थोडं एकमेकांशी गप्पा मारून मग झोपावं, कारण दिवसभर ते कामात व्यस्त असतात.
एकमेकांसाठी आणि स्वतःला वेळ देता येत नाही. त्यामुळे एकमेकांशी झोपण्याआधी थोडं बोलावं.जर रात्री झोपण्याआधी पत्नी पतीला काही समस्या सांगत असेल तर पतीने ती ऐकून घ्यावी.
कदाचित सासरी ती मोठ्या समस्येतून जात असावी आणि ती कुणासोबत ते शेअर करू शकत नसेल. तर तिची समस्या ऐकून त्याचं निराकारण करणं हा पतीचा धर्मच आहे.बेडरूममध्ये गेल्यानंतर
पती-पत्नीने एकमेकांना मिठी जरूर मारावी. असं केल्यानं त्यांना आनंद मिळतो. यामुळे त्यांच्यातील प्रेम वाढतं. त्यांचं नातं अधिक घट्ट होतं. आचार्य चाणक्य सांगतात की पती-पत्नीने सकाळी उठल्यावर
काही कामं एकत्र करायला हवीत. यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस आणि वैवाहिक आयुष्य चांगलं जाईल. चाणक्यनीतीमध्ये याचा उल्लेख आहे.पती-पत्नीने दिवसाची सुरुवात प्रेमाने करावी. सकाळी उठल्या उठल्या एकमेकांना मिठी मारावी आणि प्रेम करावं.
यामुळे दोघांचाही मूड पूर्ण दिवस फ्रेश राहिल, उत्साह येईल, सर्व काम अधिक ऊर्जेने करू शकतात. प्रेम आणि विश्वास बनून राहिल.देवाचा आशीर्वाद मिळावा यासाठी दिवसाची सुरुवात लवकर करणं
शुभ असतं. यामुळे तुमच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा राहते. पती-पत्नीनेसकाळी देवाची पूजा करावी. यामुळे तुमच्या आयुष्यात सौभाग्य येईल.पती-पत्नीने सकाळी अंघोळीनंतर एकत्र तुळशीला जल
अर्पित केलं तर आयुष्यभर त्यांचं नातं चागलं राहतं. वैवाहिक आयुष्यात कोणतीच समस्या येत नाही. धनप्रपाती होते.सकाळी पती-पत्नीने एकत्र योगा करावा.