नेवासा
नेवासा तालुक्यातील प्रवरा व गोदावरी नद्या संगमकाठी टोका येथील असलेल्या सिध्देश्वर मंदिर प्रांगणात बालयोगी महेश्वरानंद महाराज यांच्या अनुष्ठान तपोत्स्वव सोहळ्याची आज नवव्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांनी व पंचवीस हजार भाविकांना महाप्रसाद देवून सांगता झाली.
महेश्वरानंद महाराज यांनी पोटावर घट स्थापना करून दि.१० फेब्रुवारी पासून अनुष्ठान सुरू केले होते.या सोहळ्याची रविवार दि.१८ रोजी सांगता होताच महाराज दुपारी १ वाजता व्यासपीठावर आले. राज्याचे रस्ते विकास मंडळाचे उपाध्यक्ष तथा कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी सकाळी महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर अनुष्ठान सांगता झाली.
डॉ.गायकवाड यांच्या वतीने महिला भाविकांना ६ हजार साड्यांचे वितरण करण्यात आले. डॉ.गायकवाड यांनी सिध्देश्वर मंदिरात महादेव दर्शनही घेतले. गेल्या नऊ दिवसात ५० हजार भाविकांना महेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते रुद्राक्ष वाटप करण्यात आले.
काल रविवारी सांगता असल्याने पहाटे पासूनच सिध्देश्वर मंदिर प्रांगणात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. प्रांगणातील सभामंडप खच्चून भरला होता. सर्वाधिक महिला भाविकांची उपस्थितीत होती. ऋषिकेश वाकचौरे महाराज यांचे काल्याचे कीर्तना नंतर पंचवीस हजार भाविकांनी महाप्रसाद घेतला. गंगापूर, वैजापूर, कन्नड, सिल्लोड, पैठण, नेवासे, शेवगाव,श्रीरामपुर आदी तालुक्यातील भाविकांची गर्दी केली होती.५० स्वयंसेवक सेवेकऱ्यानी यावेळी नियोजन केले. गेल्या नऊ दिवसात सत्तर हजारहून अधिक भाविकांनी सिध्देश्वर व महेश्वरानंद यांचे दर्शन घेतले. गेल्या नऊ दिवसात दररोज अन्नदान, प्रवचन, आरती सोहळा साजरा करण्यात आला. आज सांगतेला सिध्देश्वर मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. गणेश चौगुले यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.
आजचा महाप्रसाद डॉ. गायकवाड, ईशा कोकरे, मेजर रोकडे व नितीन भालेराव यांचे वतीने देण्यात आला.
अनिल ताके , बाळासाहेब ससे,गणेश डावखर, वैभव मते शिवाजी डावखर , सोपान ठोंबरे , कॅप्टन कुमार च, शुभम खंडागळे, शंतवन खंडागळे , कैलास खंडागळे , अनिल गर्जे,डॉ बाळासाहेब कोलते डॉ विद्या कोलते,योगेश आहेर, सलीम पठाण, विलास थोरात आदी सेवेकरी यांचेसह पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, विकास पाटील, हवालदार संजय माने यांचेसह महिला पोलिस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवत मदत केली.