माय महाराष्ट्र न्यूज: 1 फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेटमध्ये सौरऊर्जा योजनेची घोषणा केली होती. पीएम सूर्योदय योजनेची घोषणा
करण्यात आली होती. त्यातंर्गत ग्राहक त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावल्यास 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे.PM Surya Ghar Yojana ग्राहकांना सबसिडी मिळणार.
ग्राहकांना या योजनेतंर्गत 300 युनिट वीज मोफत मिळणार.अधिक वीज उत्पादन झाले तर त्यातून 18000 रुपयांपर्यंत कमाई करता येईल.या योजनेसाठी केंद्र सरकारने 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
बँकेत या योजनेसाठी कर्ज मागितल्यास त्यावर ग्राहकांना सवलत पण मिळणार.या योजनेसाठी ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करता येईल.अर्ज करण्यासाठी ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या
संकेतस्थळावर जावे लागेल.Rooftop Solar Scheme या पर्यायावर क्लिक करावे लागेल.सूर्योदय योजनेतंर्गत सरकार एक कोटी घरांवर सौर ऊर्जेसाठी पॅनल बसवणार आहे. त्यासाठी बजेटमध्ये घोषणा करण्यात आली आहे. सोलर पॅनलच्या
मदतीने मोफत वीज मिळेल. ज्यांच्या घरावरील छतावर सोलर पॅनल बसविता येणार आहे, त्या कुटुंबांना या योजनेत सहभागी करुन घेण्यात येणार आहे. ही योजना गरीब आणि मध्यमवर्गासाठी आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.50 लाखांपेक्षा कमी आहे. त्यांना फायदा होईल.
कोणताही भारतीय नागरीक, संस्था,स्वतःचे घर हवे आणि त्यावर मोकळी जागा हवी.हे घर मजबूत आणि छतावर सहज सोलर पॅनल बसविता येण्याची सुविधा असावी.अर्जदाराकडे वीज जोडणी असावी.
असा करा अर्ज:https://pmsuryaghar.gov.in/consumerRegistration वर जा.या ठिकाणी नाव, पत्ता आणि इतर संपूर्ण तपशील भरा.या ठिकाणी सबसिडी किती मिळणार हे पण तपासता येईल.
भविष्यात या योजनेत केवळ घराच्या छतावरच नाही तर शेत, मोकळ्या जागेवर पण सोलर पॅनल लावतील.