Saturday, May 4, 2024

कोरोनामुळं भारतीयांच्या फुफ्फुसांचे प्रचंड नुकसान; हा अहवाल चिंता वाढवणारा

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:करोनामुळं आर्थिक आणि शारिरीक असे दोन्हीपद्धतीने भारतीयांना नुकसान सोसावे लागले आहे. अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार, करोना महामारीमुळं भारतीयांची

फुफ्फुस खूप कमकुवत झाली आहेत. क्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोरने केलेल्या एका अहवालानुसार, कोविड-19 मुळं फुफ्फुस कमजोर झाली आहेत. युरोपीय आणि चीन नागरिकांच्या तुलनेने भारतीयांना

अधिक नुकसान सोसावं लागलं आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या नोंदीनुसार, काही जण वर्षभरातच बरे झाले आहेत तर काहींना आयुष्यभर हा त्रास सहन करावा लागणार आहे.या संशोधनासाठी 207 लोकांच्या

फुफ्फुसांचे निरीक्षण करण्यात आले. ज्या रुग्णांना सौम्य व तीव्र स्वरुप किंवा गंभीर स्वरुपाचा कोविड झाला होता. त्यांच्या फुफ्फुसाचे निरीक्षण करण्यात आले. त्यासाठी त्यांना सहा मिनिटांचा वॉक टेस्ट,

ब्लड टेस्ट आणि बॉडी चेकअप करण्यात आले. सर्वात जास्त संवेदनशील फुफ्फुसांची तपासणी करण्यात आली. याला गॅस ट्रान्सफर (DLCO) असं म्हटलं जातं. याच्या माध्यमातून हवेतून ऑक्सिजन खेचण्याची

क्षमता मोजली जाते. या तपासणीत आढळून आले की, 44 टक्के लोकांच्या फुफ्फुसांचे नुकसान झाले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्थिती खूपच चिंताजनक आहे. 35 टक्के लोकांच्या फुफ्फुसांना कमी

नुकसान पोहोचले आहे. 35 टक्के लोकांना फुफ्फुस आंकुचित पावले आहेत. म्हणजेच ऑक्सीजन घेताना फुफ्फुस पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत. 8.3 टक्के लोकांना श्वास घेताना त्रास होण्याचे

निरीक्षण आढळले आहे.या अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सीएमएस वेल्लोरच्या पल्मोनरी विभागाच्या डॉ. डीजे क्रिस्टोफर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रुग्णांमध्ये चीन व युरोपीयन

रुग्ण्यांच्या तुलनेत फफ्फुसांचे अधिक नुकसान झाले आहे. त्याव्यतिरिक्त चीन आणि युरोपातील लोकांच्या तुलनेत भारतीयांना मधुमेह आणि हायपरटेन्शनचा त्रासही अधिक जाणवतो.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!