Wednesday, August 17, 2022

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तर ….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात कोरोनाने हाहाकार माजला आहे .त्यामध्ये अनेकांचे जीव गेले आहे .कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.दरम्यान कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची गरज ७७ टक्क्यांनी व प्रकृती गंभीर होऊन आयसीयूमध्ये हलविले

जाण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांनी कमी होते. हा निष्कर्ष तमिळनाडूतील वेल्लोर येथील सीएमसी महाविद्यालयाने केलेल्या एका अभ्यासातून काढण्यात आला आहे.विविध रुग्णालयांतील हजार आरोग्यसेवकांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास या संसर्गापासून ६५ टक्के संरक्षण मिळते.

कोविशिल्ड या लसीच्या एका डोसनेही शरीरात पुरेशा प्रमाणात अँटिबॉडीज तयार होतात. त्यामुळे रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज ९० टक्क्यांनी कमी होते असे या अभ्यासात दिसून आले. देशामध्ये कोरोना लसींचा अजूनही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर केंद्र

सरकारने वाढविले, असा आरोप काही वैद्यकीय तज्ज्ञांनी केला होता. सध्या लसीकरण मोहिमेत कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुतनिक-व्ही या तीन लसी देण्यात येतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या प्रकारच्या विषाणूंमुळे संसर्गाचे प्रमाण खूप वाढले.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!