माय महाराष्ट्र न्यूज:बारावी बोर्डाच्या परीक्षेला राज्यभरात उद्या (बुधवार) पासून सुरूवात होत आहे. परीक्षेसाठी एकुण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. परीक्षेच्या
भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.तसेच परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे.
परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात १०.३० वाजता तर दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थी २.३० पर्यंत
परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असला पाहिजे.प्रचलित पद्धती प्रमाणे माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार असून या विषयासाठी १,९४,४३९ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. तसेच ठराविक
विषयांसाठी कॅल्क्युलेटर यासाठी परवानगी दिली आहे. मात्र हे कॅल्क्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठल्या ही यंत्रात नसू नये. विद्यार्थ्यांनी कुठल्याही आणि कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे.
यावर्षी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या
विज्ञान शाखा: ७,६०,०४६
कला शाखा: ३,८१,९८२
वाणिज्य: ३,२९,९०५
वोकेशनल: ३७,२२६
आय टी आय: ४७५०.