माय महाराष्ट्र न्यूज:अहमदरनगर जिल्हातील अकोले तालुक्यातील अती दुर्गम म्हनुन ओळखल्या जानाय्रा फोपसंडी गावात ऑनलाईन शिक्षणासाठी रेंजची सुविधा नसल्याने गावच्या तुशार मुठे या चिमुकल्याने थेट पंतप्रधान मोदी यांनी पत्र पाठवले आहे.
रेंज मिळत नसल्याने तुषार डोंगरारील रोडच्या मोरीत जाऊन ऑनलाईन शिक्षण घेत आहे.फोपसंडी गावातील कलेक्टर होण्याचे स्वप्न बाळगनार १३ वर्षीय तुषार मुठेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्या व्यथा मांडल्या आहेत. अकोले तालुक्यातील फोपसंडी गावातील तुषार दत्तात्रय मुठे हा विद्यार्थी सातवीमध्ये शिकत आहे .
त्याचे स्पर्धा परीक्षा देवून जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आहे. कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. सर्व विद्यार्थी घरीच असून पालकांनी ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल उपलब्ध करुन दिले आहेत. आदिवासी भागात वीज व मोबाईल नेटवर्कचा गंभीर प्रश्न आहे. त्याने मोबाईल टॉवर , शिक्षण व वैद्यकीय सुविधा
या प्रश्नांसाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपल्या व गावच्या व्यथा मांडल्या आहेत. गावात ऑनलाईन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध होईल या आशेवर तुषार आपले जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहेत .