माय महाराष्ट्र न्यूज :- शासनाच्या कौशल्य रोजगार उदयोजकता व नाविन्यता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नाशिक विभागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार,
स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी 28 व 29 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 9-00 ते सायं. 5-00 या वेळेत भिस्तबाग महल, सावेडी, अहमदनगर येथे विभागस्तरीय नमो विशेष महारोजगार मेळावा
आयोजित केला आहे. इच्छूक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पुर्ण करून रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग आणि अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
या विभागस्तरीय रोजगार मेळाव्यासाठी विभागातील २०० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यात प्रामुख्याने मॅन्युफॅक्चरींग, कृषी क्षेत्र, बँकिंग, आय टी, फुड प्रोसेसिंग, आरोग्य, हॉस्पीटॅलिटी,
गारमेंट, शैक्षणीक, सेवा इ. क्षेत्रातील कंपन्या सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड करणार आहेत.विभागातील सर्व इच्छूक एसएससी,एचएचसी, पदवीधर (बीए/बीकॉम/बीएससी/कृषी /फार्मासिटीकल), आयटीआय
(सर्व ट्रेड) व वैद्यकिय (नर्सिंग), (आयटी, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कंप्युटर व इतर क्षेत्रातील) डिप्लोमा,डिग्री झालेल्या उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने विकसीत केलेल्या ttps://nmrmahmednagar.in/ या
संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करून पात्रतेनुसार उद्योजकांकडे अप्लाय करावे. तसेच, स्वयंरोजगार करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी शासनाचे आर्थिक सहाय्य करणारे विविध महामंडळे त्यांच्या माहितीसह उपस्थित राहणार आहेत.
याबाबत अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 0241-2995735 किंवा रोजगार मेळावा समन्वयक वसीमखान पठाण मो. नं. 9409555465, मच्छिंद्र उकिरडे मो. नं. 9595722424, संतोष वाघ मो. नं. 8830213976, बद्रिनाथ आव्हाड मो. नं. 9420725280,
योगेश झांजे मो. नं. 9588408890, आकाश बोठे मो. नं. 9699865040 व सुशिल नलवडे मो. नं. 9307322919 यांच्याशी संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.