नेवासा
कॉंग्रेस नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी सोनई येथील पीडित बालकांची व त्यांच्या कुटुंबाची भेट घेवून अत्याचारीत कुटुंबाला धीर देत रुपवते यांनी सोनई पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक अशिष शेळके यांची भेट घेऊन पुढील प्रक्रियेबद्दल महत्वाच्या सूचना केल्या
यावेळी माध्यमांशी बोलतांना रुपवते म्हणाल्या,की, “बालिकांवर आणि महिलांवर होणारे असे आघात संतापजनक आहेत.पीडित कुटुंब अतिशय गरीब व हालाखीच्या परिस्थितीत जगत आहे.एकूणच या सगळ्या घटनाक्रमामुळे हादरलेल्या दोन्ही बालिकांना लवकरात लवकर जिल्हा बाल कल्याण समिती पुढे नेण्याचे व संरक्षण देण्याचे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
शासनाच्या ज्या काही योजना लागू होऊ शकतात त्या त्वरित देण्याच्या सूचना जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी रुपवते यांनी दिल्या आहेत.त्याच बरोबर या बालिकेंची मानसिक स्थिती स्थिर होईपर्यंत आवश्यक ते समुपदेशन उपलब्ध करुन व त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी सुद्धा शासनाने घ्यावी या सूचना यावेळी रुपवते यांनी केल्या आहेत.
आरोपींना कडक शासन व्हावे यासाठी पोलीस व न्याय प्रक्रिया जलद गतीने करणे महत्वाचे आहे असून
दिवसेंदिवस महिलांवर व मुलींवर वाढत जाणाऱ्या अशा प्रकारांमुळे समाजाचे स्वास्थ्य कोलमडत असल्याचे सांगून यापुढे असे प्रकार थांबावेत म्हणून प्रशासनाच्या सर्व विभागांनी व समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची नितांत गरज असल्याची भावना यावेळी रुपवते यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.
जिल्हा बालकल्याण समिती,पोलीस प्रशासन,जिल्हा महिला व बालकल्याण विभाग यांचा समन्वय साधून पीडित बालिकांना न्याय मिळावा यासाठी महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करेल असे आश्वासन उत्कर्षा रुपवते यांनी दिले यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी साळवे व शिरसाठ हे उपस्थित होते.