Tuesday, March 10, 2026

कुकाण्यात रंगला खेळ पैठणीचा

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील मैत्रेय महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या खेळ पैठणीचा व जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
विविध स्पर्धेतील पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या डॉ. प्रिती नांगरे तर नृत्य स्पर्धेत कांचन पवार ठरल्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्या.

कुकाणा येथील डॉ. कोलते हॉस्पिटलच्या प्रांगणात मैत्रेय महिला मंडळाने जागतिक महिला दिना निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महिलांसाठी नृत्य स्पर्धा, उखाणे, गायन, संगित खुर्ची, फुगडी, ग्रुप डान्स, भारुड या बरोबरच विविध स्पर्धा घेऊन त्यामध्ये विजेत्या स्पर्धाकांना विश्वंभर मोबाईल शॉपी, ज्ञानेश्वर मोबाईल शॉपी, साई श्रद्धा कन्ट्रक्शन, औदुंबर कलेक्शन, देडगावकर ज्वेलर्स, सुपर मार्ट, स्वागत मोबाईल शॉपी यांच्या वतीने पैठणी देण्यात आल्या.

*खेळ पैठणीचा:–
प्रथम क्रमांक -डॉ. प्रिती नांगरे,
द्वितीय क्रमांक -समीक्षा गाडेकर,
तृतीय क्रमांक – प्राप्ती बोरुडे,
चौथा क्रमांक – संपदा ससे,
पाचवा क्रमांक – हर्षा मुनोत

*नृत्य स्पर्धेतील विजेत्या महिला…
प्रथम क्रमांक – कांचन पवार
द्वितीय क्रमांक- सुमन जगताप व विजया जोजार (विभागुन)
तृतीय क्रमांक – प्रितम वाघमारे
नृत्य स्पर्धेसाठी संतकृपा फर्निचर व नारायणगिरी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था यांच्या वतीने विशेष बक्षीस देण्यात आले.

या सर्व यशस्वी स्पर्धकांना सरपंच लताताई अभंग,अर्चना कांडेकर, अश्विनी विश्वंभर ,अनिता कचरे, स्वाती कासार, सिमा भंडारी, सोनाली सोनवणे, राजनंदिनी फुलमाळी
अनिता सोनवणे, कविता कासार, अनघा देडगावकर , कविता काळे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सर्व उपस्थित महिलांना किशोर चांदमल भंडारी किराणा स्टोअर्स यांच्या वतीने विक्रम चहा पावडरचे पाऊच देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मैत्रेय महिला मंडाळाच्या डॉ. विद्या कोलते, सुरेखा तुपे, लताताई अभंग ,सुनीता कचरे, अनिता कचरे,अंजली क्षीरसागर ,प्रीती नांगरे , सविता मुनोत, सुगंधा देशमुख आदिनी विशेष परिश्रम घेतले. तेजस्विनी कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ.विद्या कोलते यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!