Wednesday, August 17, 2022

नगर ब्रेकींग: उसाच्या शेतात महिलेचा विनयभंग

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील बोलकी ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या एकतीस वर्षीय महिलेचा ती आपल्या नातेवाईकांसह रस्त्याने जात असताना त्याच गावातील आरोपी प्रसाद भगवानदास महाले व गौरव भगवानदास महाले

या दोघांनी दि.१३ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ऊसाचे शेतात (गट क्रं.१५) मध्ये ओढले व तिच्या अंगावरील कपडे फाडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला तिचे नातेवाईक तिला सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही लोखंडी रॉडने मारहाण केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि दि.१३ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आपल्या नातेवाईकांसह रस्त्याने जात असताना आरोपी प्रसाद महाले व त्याचा भाऊ गौरव महाले या दोघांनी तिला उसाचे शेतात ओढले व तिच्या अंगावरील कंपडे फाडून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.त्या महिलेची

तिच्या बरोबर असलेल्या नातेवाईकांनी तिची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना या आरोपीनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण केली आहे.व जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ केली असल्याची फिर्याद या महिलेने काल रात्री आठ वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी प्रसाद महाले व गौरव महाले यांचे विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२१४/२०२१ भा.द.वि.कलम ३५४,३२४,३२३,५०४,५०६,५०९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!