माय महाराष्ट्र न्यूज:कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यात आली नसून येत्या ३१ मार्चपर्यंत ही बंदी कायम राहणार असल्याचे ग्राहक घडामोडीविषयक खात्याचे सचिव रोहितकुमार सिंह यांनी मंगळवारी सांगितले.
सरकारच्या या खुलाशामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे ३१ मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहील, असे सांगून सिंह म्हणाले की, ‘किमती वाढू नयेत
यासह देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या अनुषंगाने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.’ वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर- २०२३ मध्ये सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली होती.
केंद्र सरकारकडून कांद्याची निर्यात बंदी मागे घेण्यात आल्याचे वृत्त मागील आठवड्यात प्रसिद्ध झाले होते. यानंतर लासलगाव घाऊक बाजारात कांद्याचे दर कडाडले होते. प्रतिक्विंटलचे भाव
१२८० रुपयांवरून १८०० रुपयांवर गेले होते. मात्र ३१ मार्चपर्यंत निर्यात बंदी उठणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केल्याने कांद्याच्या दर वाढीवर नियंत्रण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठविल्याचे सांगितले. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात
सरकारने कांद्याची निर्यात बंदी केलीच नसल्याचे आता वृत्त समोर आले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये कांद्याचे वाढते भाव लक्षात घेऊन केंद्राने ३१ मार्च २०२४ पर्यंत बंदी घातली होती ती कायम ठेवली आहे.
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा संताप शेतकऱ्यांमधून व्यक्त होतेय. कांद्याच्या निर्यातीवरील बंदी ३१ मार्च या अंतिम मुदतीपर्यंत कायम राहील अशी माहिती समोर आली आहे.
कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली नाही. ती लागू आहे कोणत्याही स्थितीत बदल झालेला नाही,” असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी माहिती दिली. याबाबत त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली.