Friday, May 17, 2024

नगर जिल्ह्यातील ३४ मंडळांत दुष्काळ जाहीर

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पावसाने ओढ दिल्याने नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात टंचाईची स्थिती निर्माण झाली असून, जिल्ह्यातील १३० महसूल मंडळांवर दुष्काळाचे सावट पसरलेले

आहे. कमी पावसामुळे या १३० महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर झाला आहे. या महसूल मंडळात दुष्काळी उपाययोजना लागू करण्यात आल्या. दुष्काळ जाहीर झालेल्या महसूल मंडळांत

जमीन महसुलात सूट, कृषी पंपाच्या चालू विज बिलात ३३.५ टक्के सूट व शालेय, महाविद्यालयीन विद्याथ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, आवश्यक तेथे पाणी टँकर, टंचाई जाहीर केलेल्या गावात

शेतकयांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे, अशा उपायोजना लागू करण्यात आल्या आहेत. यंदा जून महिन्यापासूनच पावसाने ओढ दिल्याने खरिपाचा हंगाम धोक्यात आला होता.

जून ते ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खरिपाचे उत्पादन देखील घटले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार परतीच्या पावसाकडे होती. मात्र परतीचा

पाऊसही अल्प प्रमाणात झाल्याने रब्बी हंगाम देखीलवाया गेला होता.कमी पावसामुळे शेतीचे उत्पादन घटले असतानाच गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून पाणी टँकरलाही मागणी वाढली आहे.

यापूर्वी ५० पैशपिक्षा कमी आणेवारी असलेली ९६ महसूल मंडळे जाहीर करण्यात आली होती. शासनाच्या नव्या निर्णयानुसार आता दुष्काळी महसूल मंडळाची संख्या आणखी ३४ ने वाढली.

१३० महसूल मंडळात दुष्काळजन्य परिस्थिती उद्‌भवली आहे. ज्या महसूल मंडळात जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीपर्यंत सरासरी पर्जन्यमानाच्या ७५ टक्के पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

या ३४ महसूल मंडळांचा नव्याने झाला समावेश

साकेत, पाटोदा (जामखेड), मुंगी, दहिगव्हाणे (शेवगाव), भानगाव, वाढगाव, लोणी व्यंकनाथ (श्रीगोंदे), कान्हूर पाथर, पालवे खुर्द, जवळरा, अलकुटी (पारनेर), भानस हिवरे, प्रवरसंगम, देडगाव (नेवासे),

अस्तगाव (राहगाव) ), कोरेगाव (श्रीरामपूर) कोकमठाण (कोपरगाव), खिरवरे, लिंगदेव, वाकी, रुंभोडी (अकोले) अकोला, खरवंडी, तिसगाव (पाथर्डी), बारागाव नांदूर (राहुरी), नेप्ती (नगर), कोरेगाव,

खेड, कुळधरण, वालवड (करंजर) ) वनांदूर खंदरमाळ, संगमनेर खुर्दनिमोन, घुलेवाडी (संगमनेर) किंवा महसुल मंडळाचा अलीकडेच समावेश करण्यात आला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!