Sunday, December 22, 2024

मित्राचे मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो.

मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालोय. मी यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलो नाही. मी मनोज जरांगे याला पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे

पाटील पदासाठी काही नाही, असं मनोज जरांगे यांचा अत्यंत जवळचा मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

मनोज जरांगे हा नाटकी माणूस आहे. त्याचा मिटिंग रात्री होतात. वाशीला आंदोलल पोहचलो. त्या रात्री पुन्हा गुप्त मिटिंग केल्या. अधिसूचनेत म्हटलं हे लागू सोळा तारखेला होईल. पण त्याची इच्छा होती, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

इथं येऊन मला पाणी पाजावं. जरांगेला फक्त श्रेय हवं. जेसीबीतून फुलं हवीत कार्यक्रम हवेत. आरक्षण गरिबाला हवंच आहे. पण याचं काय? याला तर फक्त श्रेय हवं आहे, असं म्हणत अजय महाराज बरासकर यांनी जरांगेंच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

मनोज जरांगेची मुलगी म्हणते, माझ्या बापाच्या देव पाया पडेल. मुलांमध्ये इतका अंहकार? सांगा हा देवापेक्षा मोठा आहे का? हा माझ्यावर आरोप करतो सरकार आणि भुजबळ यांचा माणूस आहे. म्हणून

माझा आणि कोणाचा संबंध नाही. आजपर्यंत एक ही पत्र सरकारला त्याने स्वतः दिलं नाही. रोज पलटी मारतो तो… सगळ्या मिटिंग कॅमेरावर करतो. याला घोडा लावतो त्याला घो#@ लावतो, असं अजय महाराज म्हणाले.

23 डिसेंबरला गुप्त मिटिंग काहीं जणांसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. रांजन गाव गणपती इथं उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मिटिंग केली आहे. लोणावळा, वाशीमध्ये ही समाजाला वगळून मिटिंग केली. वाशी आंदोलन इथवर मी आंदोलक

म्हणून सहभागी होतो. मात्र त्यांचा मिटिंगमुळे मला आक्षेप होता. जरांगेला काडीची अक्कल नाही. पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो पण स्वतःच काय?, असा सवाल अजय महाराज बरासकर यांनी केला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!