माय महाराष्ट्र न्यूज : राजकीय खलबतंही जोरदार होऊ लागली आहेत. काँग्रेसने विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन 1 वर्ष सात महिने झाले असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला एक सल्ला दिला आहे. फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे.
काँग्रेस ने पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे जर काँग्रेस ला मुख्यमंत्री पद दिले जात नसेल तर काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढावा असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
आठवले यांनी म्हटलं आहे की, नाना पटोले यांनी नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल तसेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यास नाना पटोले यांची तयारी असल्याची इच्छा नाना पटोले यांनी स्वतः व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा
आग्रह धरला पाहिजे आणि मुख्यमंत्री पद मिळविले पाहिजे. जर मुख्यमंत्री पद देण्यास महाविकास आघाडी सरकार तयार नसेल तर महाविकास आघाडी सरकार चा पाठिंबा काँग्रेस काढला पाहिजे असे रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.