नेवासा/प्रतिनिधी
येणाऱ्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास करून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व निर्माण करून नवनवीन तंत्रज्ञान वापरून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण करावी. भविष्यवेधी आनंददायी शिक्षण द्यावे असे आवाहन नेवाशाचे गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटेकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद,पुणे यांच्या मार्फत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करतांना
श्री.पाटेकर बोलत होते. दा.ह.घाडगे पाटील माध्यमिक व उच्च विद्यालयाचे प्राचार्य सोपान काळे,विषयतज्ञ समी शेख,जळकाचे प्राचार्य जयराम जाधव, गणित तालुका संघाचे अध्यक्ष संजय काळे,काटे सर,मदन लाड आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी सुलभक देविदास आंग्रख,अमोल बरबडे ,शिराज शेख, मंजुश्री जाधव,बाळासाहेब भोसले, अविनाश निकाळजे, विष्णू गारुळे, अविनाश टाक,ईस्माइल शेख, बाळासाहेब पवार,कावेरी मापारी,निर्मला धुमाळ, मच्छिंद्र भोसले,संजय चव्हाण,विशाल निकम,मनिषा राऊत,भारती वाकचरे, अंजना सोनवणे, चंद्रकांत कचरे, महेश देशमुख, सचिन देशमुख डी.के.गवळी,अमजद पठाण,समीर शेख ज्ञानेश्वर घावटे, जगन्नाथ,जयंत पाटील कांबळे,आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा वाकचौरे यांनी केले.सूत्रसंचालन गोवर्धन रोडे यांनी केले. लाटे सर यांनी आभार मानले.