माय महाराष्ट्र न्यूज:पंजाब आणि हरियाणा राज्यांच्या शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांना सीमेवरच अडवले आहे. पण, शेतकरी दिल्लीला
जाण्यासाठी ठाम आहेत. याच दरम्यान केंद्र सरकारने रात्री उशिरा एक मोठी घोषणा केली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याची माहिती देताना सांगितले की, सरकारने शेतकऱ्यांना फायदा मिळावा
यासाठी ऊस खरेदीच्या दरात 8 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे उसाच्या भावात प्रतिक्विंटल 25 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या उसाची खरेदी किंमत 315 रुपये प्रति क्विंटल आहे.
या निर्णयामुळे ती आता 340 रुपये होईल.केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, ‘मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. याअंतर्गत दोन महत्त्वाचे
निर्णय घेण्यात आले. उसाचा खरेदी दर निश्चित करण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला आहे. उसाची खरेदी किंमत म्हणजे एफआरपी ₹ 340 प्रति क्विंटल करण्यात आली आहे. जी पूर्वी ₹ 315 प्रति क्विंटल होती.
केंद्रीय मंत्रिमंडळाने साखर हंगाम 2024-25 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी साखर कारखानदारांनी देय असलेल्या उसाच्या ‘वाजवी आणि लाभदायक किंमत’ (FRP) ला मंजुरी दिली आहे. उसाची
एफआरपी 315 रुपये प्रतिक्विंटलवरून 340 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे. म्हणजे उसाच्या भावात क्विंटलमागे 25 रुपयांनी वाढ झाली आहे.