Thursday, January 23, 2025

इमरान दारूवाला यांच्या हद्दपारीला अंतरिम ‘स्थगिती’

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा शहरातील सामाजिक कार्यकर्ते इमरानभाई दारूवाला यांच्यावर अहमदनगर उपविभागीय अधिकारी यांनी केलेल्या नगर जिल्हा हद्दपरीच्या कारवाईला नाशिक विभागीय आयुक्तांनी पुढील सुनावणी होई पर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे.

नेवासा पोलिसांनी गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते इम्रान दारुवाला यांच्या विरोधात अहमदनगर उपविभागीय अधिकारी यांचेकडे नगर जिल्हा हद्दपरीच्या कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. दरम्यान, गेल्या आठवड्यात महसूल उपविभागीय अधिकारी यांनी दारुवाला यांच्या नगर जिल्हा हद्दपरीच्या कारवाई केली होती.
मात्र, उपविभागीय अधिकारी यांच्या निकालाच्या विरोधात दारुवाला यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करून या आदेशाला स्थगिति द्यावी म्हणून विनंती केली होती. ती विनंती त्यांनी मान्य करत उपभागीय अधिकारयांच्या आदेशाला पुढील सुनावणी होई पर्यंत अंतरिम स्थगिति दिली आहे. पुढील सुनावणी ५ मार्च २०२३ रोजी होणार आहे.याकामी इम्रान दारुवाला यांच्या तर्फे प्रसिद्ध विधिज्ञ ऍड. नीरज नांगरे, ऍड. शेखर गोर्डे यांनी काम पाहिले.

आकासातून कारवाई : इम्रान दारुवाला

उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाला विभागीय आयुक्त यांच्या कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली. असुन माझ्यावर रस्तारोकोचा हा राजकीय गुन्हा आहे. व अन्य दोन हे न्यायप्रविष्ट गुन्हा आहे. असे एकूण तीन गुन्ह्यातचे कारण पुढे करत अधिकारी व राजकीय मंडळींनी राजकीय आकासाने मला यात गोवले आहे. तीन गुन्ह्यवर आमच्या प्रतिष्ठित कुटुंबाला व मला ‘गुन्हेगार’ म्हणून संबोधले गेले याचे मनाला वाईट वाटत आहे. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याने मला निश्चितच न्याय मिळेल असे दारुवाला यांनी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!