माय महाराष्ट्र न्यूज:सरकार नेहमीच नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. सरकार शेकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी
यासाठी ही योजना राबवली जाते. या योजनेचा १६ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.आता या योजनेच्या 16व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना eKYC करावे लागेल.प्रधानमंत्री किसान
सन्मान निधी योजना (पीएम किसान 16 वा हप्ता) केंद्र सरकारद्वारे चालवली जात आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये हप्त्याने दिले जातात. प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये
जमा केले जातात.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 15 व्या हप्त्याची रक्कम जारी केली होती. याचा फायदा 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना झाला आहे.
आता शेतकरी 16 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.पीएम किसान योजनेत दर चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो. 51 वा हप्ता नोव्हेंबरमध्ये जारी करण्यात आला होता.किसान सन्मान निधीचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी पाठवण्यात येणार आहे.
किसान सन्मान निधीच्या 16 व्या हप्त्याबाबत अपडेट जारी करण्यात आले आहे. सरकारी वेबसाइटनुसार, 28 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल. या अंतर्गत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी पोर्टलवर त्यांचे ई-केवायसी पूर्ण करावे लागेल.
काही शेतकऱ्यांना लाभ का मिळणार नाही?:सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घेतले आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारने ई-केवायसी प्रक्रियाही खूप सोपी केली आहे.
आता ओटीपी आधारित ई-केवायसी पीएम किसान पोर्टलला भेट देऊन करता येईल. याशिवाय बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी शेतकऱ्याला जवळच्या सीएससी केंद्रात जावे लागेल.OTP आधारित e-KYC PM
किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित eKYC साठी शेतकरी त्यांच्या जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधू शकतात.तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही यासाठी सहज नोंदणी करू शकता.
नोंदणी कशी करावी:pmkisan.gov.in ला भेट द्या.आता Farmers Corner निवडा.यानंतर ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करा.यानंतर ग्रामीण किंवा शहरी नोंदणी निवडा.आता आधार क्रमांक,
मोबाइल क्रमांक भरा आणि राज्य निवडा आणि OTP निवडा.मोबाईलवर मिळालेला OTP टाका.यानंतर राज्य, जिल्हा आणि बँक खाते अशी उर्वरित माहिती भरा.आता ‘Submit for Aadhaar
Authentication’ वर क्लिक करा.एकदा आधार प्रमाणीकरण झाले की, तुमचे जमिनीचे दस्तऐवज अपलोड करा आणि सेव्ह करा.