Monday, May 27, 2024

शिक्षकांना सर्वात मोठा दिलासा

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरेंच्या प्रयत्नांमुळे राज्यातील शालेय शिक्षक आणि विद्यार्थ्यांना निवडणूक काळात मोठा दिलासा मिळणार आहे. राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे

नेते अमित ठाकरेंनीच यासंदर्भात एका पोस्टमधून माहिती दिली आहे. राज ठाकरेंनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एक पत्रक जारी करत महत्त्वाचा आदेश दिला आहे.

अमित ठाकरेंनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाच्या प्रतीच्या 2 पानांचा फोटो पोस्ट केला आहे. हे पत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांबरोबरच मुंबई शहर आणि मुंबई

उपनगरातील जिल्हाधिकारी वर जिल्हा निवणूक अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. अमित ठाकरेंनी या आदेशाचा फोटो शेअर करताना, “शालेय शिक्षकांना निवडणुकीची कामे करण्यास भाग पाडले जात

असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हा मुद्दा चार दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मीडियासमोर मांडला होता. राज ठाकरेंच्या आदेशानुसार दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक

अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची भेट घेऊन “कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये” अशी भूमिका आग्रहपूर्वक मांडली आणि केवळ शिक्षकांवर अवलंबून न राहता पर्यायी

व्यवस्था उभारताना माजी शासकीय कर्मचारी आदींनाही सामावून घ्यावे, अशी सूचना केली होती,” असं म्हटलं आहे.”महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आग्रहामुळे काल (22 फेब्रुवारी 2024 रोजी) रात्री

उशिरा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ‘मुंबईचे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी तातडीची बैठक घेऊन शिक्षकांना वगळून अन्य कर्मचारी अधिगृहीत करण्याबाबतच्या

सर्व शक्यता तपासून तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घ्यावा’ असा आदेश दिला आहे,” अशी माहिती अमित ठाकरेंनी दिली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!